Missing, Contact about a missing person; Appeal to the police
चंद्रपूर :- चंद्रपूर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दोन व्यक्ती बेपत्ता झाल्या असून पोलिस विभागाद्वारे दोन्ही व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. चंद्रपूर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून उत्तम रंजित मैत्र (वय 36 वर्षे) व गोपाल गजेंद्र हालदार (वय 55 वर्षे) हे दोघे बेपत्ता झाले आहेत. Missing उत्तम मैत्र हे भिवापूर वॉर्ड, बंगाली कॅम्प प्रांतिक कॉलनी येथील रहिवासी असून 18 मार्च 2024 रोजी दुपारी 12 वाजता शहरात जाऊन येतो, असे सांगून निघाले होते. मात्र तेव्हापासून त्यांचा मोबाईल नंबर बंद आहे. Missing, Contact about a missing person; Appeal to the police
तर गोपाल हालदार हे अरुण नगर, अर्जुनी मोरगाव, जिल्हा गोंदिया येथील रहिवासी असून मागील 15 वर्षांपासून भिवापूर वॉर्ड, चंद्रपूर येथे किरायाने राहुन वाढई काम करीत होते. 15 डिसेंबर रोजी त्यांच्या मुलाने फोन केला असता मोबाईल बंद आढळल्याने दुसऱ्या दिवशी कुटुंबियांनी घरी भेट दिली असता घर कुलुपबंद आढळून आले. त्यामुळे दिनांक 14 डिसेंबर 2023 पासुन बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे. यापैकी कुणीही आढळल्यास त्वरित पोलिस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस विभागाने केले आहे.