Sunday, December 8, 2024
Homeक्रीडा व मनोरंजनगुणवंत विद्यार्थी हे राष्ट्राचे भुषण : आमदार सुभाष धोटे ; पडोली...
spot_img
spot_img

गुणवंत विद्यार्थी हे राष्ट्राचे भुषण : आमदार सुभाष धोटे ; पडोली येथे मान्यवरांचे सत्कार व गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्याचे आयोजन

Meritorious students are the jewel of the nation: MLA Subhash Dhote ; Honoring dignitaries and meritorious students at Padoli.

चंद्रपूर :– बाल व महिला कल्याण मंडळ, पांढरकवडा त. जि. चंद्रपूर द्वारा संचालित इंदिरा गांधी विद्यालय, पडोली च्या वतीने चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार मा. सुभाषभाऊ धोटे यांच्या अध्यक्षतेखाली विविध मान्यवरांचे सत्कार व इयत्ता १० वी, १२ वी च्या गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार मा. सुभाषभाऊ धोटे, शिक्षक आमदार मा. सुधाकर अडबाले व अन्य मान्यवरांचे सत्कार करण्यात आले तर गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले की, गुणवंत विद्यार्थी हे राष्ट्राचे भुषण असून अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना अभिमान वाटतो. विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास, परिश्रम, जिद्द, चिकाटी ने आपल्या आवडीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून आयुष्यात अपेक्षित यश संपादन करावे.

या प्रसंगी लायल मेटल घुगुस चे सी. एस. आर फंड विभागाचे मॅनेजर रतन साहेब, नम्रपाली गोडाने मॅडम, बाल व महिला कल्याण मंडळ चे अध्यक्ष चंद्रकांत गोहोकर, काँग्रेसचे सरचिटणीस प्रविण लांडगे, घुगुस काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू रेड्डी, कोसाराचे सरपंच कृत्तिका नरूले, विक्की लाडसे, एम. डी. अमेरिका डॉ. निखील गोहोकर, माजी मुख्याध्यापिका तथा सहसचिव गोहोकर मॅडम, ग्रामिण तालुका चंद्रपूरचे अध्यक्ष अनिल नरूले, चंद्रपूर प. स. सभापती विजयराव बल्की, पांढरकवडा चे सरपंच सुरेश तोतडे, वडा चे सरपंच किशोर वरारकर, दाताळा चे सरपंच देशकर मॅडम, एन.एस.यु.आय अध्यक्ष अश्फाक शेख, बा. क. मंडळाचे सचिव कवडुजी वरारकर, संचालक संजय बल्की, प्रतिभाताई वासाडे, इंदिरा गांधी विद्यालय पांढरकवडा चे मुख्याध्यापक एस. जी. खनगन, इंदिरा गांधी विद्यालय पडोली चे मुख्याध्यापक डी. एन. मडावी यासह बाल व महिला कल्याण मंडळ चे सर्व संचालक, शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular