Mental Harassment by In-Laws with Wife : In-laws took possession of Hayva, Tractor too
चंद्रपूर :- पत्नी, सासरा आणि सासरच्या मंडळीकडून नाहक मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप राजुरा येथील अंकुश वसंतराव भोंगळे या पीडित पतीने चंद्रपुरात आयोजित पत्रकार परिषदेत केला. Mental Harassment by In-Laws with Wife
अंकुश भोंगळे यांनी पत्रपरिषदेत दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र विठ्ठल डोहे यांच्या मुलीशी अंकुशचा 9 जुलै 2019 रोजी विवाह झाला होता. दीड वर्ष सुखाचा संसार चालला यादरम्यान, एक मुलगाही झाला. परंतु, नंतर पत्नी मृणाल हिने क्षुल्लक कारणावरून वाद घालणे सुरू केले.
17 जुलै 2020 रोजी पत्नी मृणालने आपल्या आईवडिलांना बोलावून घेतले. यावेळी सासरा, सासू, मेव्हणा, आतेमामा व अन्य गुंडप्रवृत्तीच्या युवकांनी मध्यरात्री माझ्या घरी येऊन वाद घातला आणि शिवीगाळ केली आणि 8 दिवसानंतर मृणालला सोबत घेऊन गेले. महिनाभरानंतर परत तिला माझ्याकडे आणून सोडले. परंतु, कोणत्या ना कोणत्या कारणाने पत्नीने वाद घालणे सुरूच ठेवले.
28 नोव्हेंबर 2020 पासून मृणाल ही माहेरीच आहे. परंतु, तिच्या कुटुंबीयांकडून हुंडाबळी आणि कौटुंबिक हिंसाचाराचे खोटे गुन्हे दाखल करून माझ्यासह कुटुंबीयांना त्रास देण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप अंकुशने यावेळी केला. Allegation of victim husband’s in Press Conference
हायवा क्रमांक एमएच 34 एवी 2583 व ट्रॅक्टर क्रमाक एमएच 34 बीआर 3198 ही दोन्ही वाहने सासरा राजेंद्र डोहे यांच्या त्रीवेणी ट्रान्सपोर्ट कंपनीत लावून व्यवसाय करीत असताना वादानंतर त्यांनी ही दोन्ही वाहने आपल्या ताब्यात घेतले आहे. त्यामुळे माझे आर्थिक नुकसान होत आहे. दरम्यान, राजेंद्र डोहे व कुटुंबीयांविरोधात राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
यानंतर पत्नी मृणालचा भाऊ जुगल डोहे, राजेंद्र डोहे व काही गुंडप्रवृत्तीच्या युवकांनी बसस्थानक परिसरात माझ्यावर प्राणघातक हल्ला केला. या घटनेची राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यानंतर राजेंद्र डोहे हे मला व माझ्या वडिलाला गोळी मारून जिवे मारण्याची धमकी देत असल्याचा आरोपही यावेळी पीडित पती अंकुश ने केला आहे.
राजेंद्र डोहे एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असून, राजकीय पाठबळावर ते धमक्या देत असून, पोलिसांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी अंकुश भोंगळे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.