Tuesday, March 25, 2025
HomeAgricultureपर्यावरणाच्या अस्तित्वासाठी साहित्यातून प्रबोधन व्हावे - मनोज बोबडे : पं.स चंद्रपूर व...

पर्यावरणाच्या अस्तित्वासाठी साहित्यातून प्रबोधन व्हावे – मनोज बोबडे : पं.स चंद्रपूर व फिनिक्स तर्फे रंगले ‘माझी वसुंधरा’ कविसंमेलन

For the existence of the environment, there should be enlightenment through literature
– Manoj Bobde

‘Mazi Vasundhara’ poetry meeting organized by P. S. Chandrapur and Phoenix

चंद्रपूर :- काळी माती, झूळझूळणारा निर्झर, हिरवे जंगल, निळे आकाश, प्राणदायी हवा ही सारी अनमोल जीवनदायी तत्वे, ज्यात आपल्या जीवनाचं काव्य दडलेलं आहे. मात्र ग्लोबल वार्मिंग, हवामान बदलामुळे याचे अस्तित्व हळूहळू गमावत चालले आहे. आपण या सगळ्यांचा अविभाज्य भाग असताना पर्यावरणाचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न करणे कवी म्हणून आपलेही काम आहे. कवितेच्या माध्यमातून साहित्यातून व्यापक प्रबोधन होण्याची गरज असल्याचे मत राजूरा येथील प्रसिद्ध कवी, साहित्यिक मनोज बोबडे यांनी व्यक्त केले.

पंचायत समिती चंद्रपूर व फिनिक्स साहित्य मंचातर्फे नुकतेच ‘माझी वसुंधरा’ या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाअंतर्गत कविसंमेलन पार पडले. कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी कवी मनोज बोबडे तर प्रमुख अतिथी म्हणून कवी प्रब्रम्हानंद मडावी, गटविकास अधिकारी धनंजय साळवे, फिनिक्स साहित्य मंचाचे नरेशकुमार बोरीकर उपस्थित होते. कविसंमेलनाचे उद्घाटन उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिना साळूंखे यांनी केले. भूमी,जल,वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारित कविसंमेलन घेवून कविंच्या शब्दातून पर्यावरणावर जनजागृती घडवून आणणे, हा उपक्रम स्तुत्य असल्याचे मत यावेळी साळूंखे यांनी व्यक्त केले. पर्यावरणाचे जतन, संवर्धन व संरक्षण करण्यासाठी माझी वसुंधरा हा अभिनव उपक्रम महाराष्ट्र शासनाने हाती घेतला आहे. या उपक्रमाला वाढविण्यासाठी व यातून वातावरणीय बदल आणि पर्यावरणाच्या समस्यांबद्दल नागरिकांना साहित्याच्या माध्यमातून जागरूक करण्यासाठी कविसंमेलन प्रभावी माध्यम व नाविण्यपूर्ण उपक्रम असल्याचे मत गटविकास अधिकारी धनंजय साळवे यांनी व्यक्त केले. ‘Mazi Vasundhara’ poetry meeting organized by P. S. Chandrapur and Phoenix

कविसंमेलनात कवी डॉ.किशोर कवठे, विजय वाटेकर, अविनाश पोईनकर, प्रदिप देशमुख, राजेंद्र घोटकर, धर्मेंद्र कन्नाके, सुधाकर कन्नाके, सुरेंद्र इंगळे, गिता रायपूरे, बी.सी.नगराळे, सुनिल बावणे, पंडित लोंढे, मिलेश साकुरकर, राजेंद्र भानोसे, भारती लखमापूरे, सुनिल पोटे, अर्जूमन शेख, ईश्वर टापरे, दुशांत निमकर, संतोषकुमार उइके आदी कवी सहभागी होवून वसुंधरेचा जागर कवितेतून केला. कविसंमेलनाचे बहारदार सुत्रसंचालन कवी गोपाल शिरपूरकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पंचायत समीतीचे अधिकारी,कर्मचारी, शिक्षकवृंद यांनी परिश्रम घेतले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular