Thursday, November 30, 2023
Homeराजकीयमतिन कुरेशी यांची काँग्रेसच्या अल्पसंख्याक महानगर अध्यक्षपदी निवड ; अल्पसंख्याक समूदायाला काँग्रेसशी...

मतिन कुरेशी यांची काँग्रेसच्या अल्पसंख्याक महानगर अध्यक्षपदी निवड ; अल्पसंख्याक समूदायाला काँग्रेसशी जोडण्याचा प्रयत्न करणार – मतीन कुरेशी

Matin Qureshi elected as Congress Minority Metropolitan President;  Will try to connect minority community with Congress – Mateen Qureshi                                                                चंद्रपूर :- महानगरातील अल्पसंख्याक समूदायाला काँग्रेस पक्षासोबत जोडण्यासाठी आपण कटिबद्ध असून, यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करू असा विश्वास मतीन कुरेशी यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेसच्या अल्पसंख्याक महानगर अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मतीन कुरेशी यांनी चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

पक्षाने टाकलेला विश्वास आपण सार्थ ठरवू. पक्षाला शहरात बळकट करण्यासाठी आपले नेहमीच प्रयत्न राहिले आहे. यापुढेही पक्ष बळकटीसाठी प्रयत्नरत राहू. पुढील पंधरा दिवसात प्रभाग तेथे अल्पसंख्याक काँग्रेसची शाखा स्थापन करून पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करणार असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले. अल्पसंख्याक समाजाच्या विकासावर आपला अधिक भर असणार आहे, असेही ते म्हणाले. कुरेशी काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. विविध सामाजिक उपक्रमात त्यांचा नेहमीच सिंहाचा वाटा राहिला आहे. पक्षाने त्यांच्या कामाची दखल घेत महानगरअध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्याची शिफारस पक्षश्रेष्ठींकडे केली होती. या शिफारशीवरून प्रदेश प्रभारी मोहम्मद अहमद यांनी कुरेशी यांची निवड केली आहे. कुरेशी यांनी या नियुक्तीचे श्रेय अल्पसंख्याक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष वजाहत मिर्जा, विधानसभा विरोधी पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर यांना दिले आहेत.

पत्रकार परिषदेला सय्यद रमजान अली, प्रा. बलवीर सिंग, ग्रामीण महिला जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर, मुन्ना तावाडे, एजाज कुरेशी, शीतल कातकर, सुभेषचंद एस. जॉन आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular