Thursday, February 22, 2024
HomePoliticalचंद्रपुरात EVM विरोधात भव्य निदर्शने ; निदर्शकांनी जनतेचे वेधले लक्ष

चंद्रपुरात EVM विरोधात भव्य निदर्शने ; निदर्शकांनी जनतेचे वेधले लक्ष

Massive protests against EVMs in Chandrapur;  Demonstrators caught the public’s attention

चंद्रपूर :- पूर्व नियोजित कार्यक्रमा नुसार दि 22 जाने.2024 ला ‘EVM इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हटाव – संविधान और लोकशाही बचाव संघर्ष समितीच्या वतीने सायं. 5 ते 7 वाजे दरम्यान EVM हटाव व बॅलेट पेपर वर निवडणुका घ्याव्यात या मागणीसाठी भव्य निदर्शने करण्यात आली. Ban EVM
निदर्शने आंदोलनात विविध सामाजिक व राजकीय संघटनेच्या पाचशे वर कार्यकर्त्यांनी भाग घेऊन जटपुरा गेट परिसर दानाणून सोडला. Electronic Voting Machine

निदर्शकांनी EVM हटाव, लोकशाही बचाव, महागाई वाढविणाऱ्या सरकारनी राजीनामा द्यावा, बँक चोरो सत्ता छोडो, रोजगार चोरो सत्ता छोडो, बलात्कारीयो को संरक्षण देनेवालो सत्ता छोडो, संविधान विरोधीयो सत्ता छोडो असे लक्षवेधक नारे देत होते. निदर्शने अतिशय शांततेत व शिस्तबद्ध रीतीने दोन तास पर्यंत चालली. यावेळी निदर्शकांनी मागण्याचे बॅनर हातात घेतले होते. निदर्शकांनी सहा हजारावर पत्रके चंद्रपूरकरांणा वाटली.

भव्य निदर्शना मध्ये सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आप, MIM, CPI, CPM, भारत जोडो, काँग्रेस सेवादल, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, वंचित बहुजन आघाडी, मुस्लिम आरक्षण हक्क संघर्ष समिती, आल इंडिया समता सैनिक दल, ओबीसी जनगणना समन्वय समिती, तेली महासंघ, कुणबी समाज संघटना, माळी महासंघ, बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन, स्वतंत्र मजदूर युनियन, जेष्ठ नागरिक संघ, गुरुदेव सेवा मंडल ई विविध सामाजिक संघटनाचे पेतिनिधी यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular