Marathi language honor day celebrated in Janata College
चंद्रपूर :- चांदा शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित जनता महाविद्यालयात चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे व जनता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम सुभाष यांच्या मार्गदर्शनात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कथालेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली.
कथा स्पर्धेच्या वेळी मंचावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. आशिष महातळे IQACसमन्वयक डॉ. नाहीदा बेग, मराठी विभाग प्रमुख डॉ.ज्योती पायघन, ग्रंथपाल डॉ. प्रशांत चहारे डॉ. कीर्ती वर्मा मंचावर उपस्थित होते.
डॉ.ज्योती पायघन यांनी प्रास्ताविक केले तर मंचावर उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मराठी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कु. स्वाती बुरडकर या विद्यार्थिनीचा प्रथम क्रमांक आला तर कु. संचाली बलकी या विद्यार्थिनीचा द्वितीय क्रमांक आला. व शिवाजी शेंडे या विद्यार्थ्यांचा तृतीय क्रमांक आला. कृष्णा पीदुरकर ,श्रेयश धाबेकर, जानवी भागेवाड या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले प्रमाणपत्र व रोख रक्कम असे बक्षीसाचे स्वरूप होते.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. महेश बेताल यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. रिंकू डोंगरे यांनी केले.
कार्यक्रमाला उपस्थित प्रा. महेश काकडे, प्रा. अडबाले, प्रा. कोल्हे, प्रा.रॉय, प्रा. सुरज बोधे, प्रा. पडशीलवार, प्रा कोंढेकर प्रामुख्याने उपस्थित होते