Sunday, April 21, 2024
Homeक्रीडा व मनोरंजनभाऊंचा दांडिया महोत्सवात सिने अभिनेता प्रथमेश परबने जिंकली उपस्थितांची मने ; दांडियात...

भाऊंचा दांडिया महोत्सवात सिने अभिनेता प्रथमेश परबने जिंकली उपस्थितांची मने ; दांडियात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची उपस्थिती

Marathi Cine actor Prathamesh Parab won the hearts of the audience at Bhau’s Dandiya Mahotsav;  Opposition leader Vijay Wadettiwar’s presence in Dandia.                  चंद्रपूर : येथील चांदा क्लब ग्राउंडवर आयोजित “भाऊचा दांडिया” महोत्सवात शनिवारी (२२ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता प्रथमेश परब यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी चित्रपटातील डायलॉग बोलून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.

दांडियाप्रेमी युवक, युवतींसह महिला, पुरुषांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असलेल्या या महोत्सवात शनिवारी प्रथमेश परब यांनी उपस्थिती दर्शवून दांडिया नृत्य उत्सवाची रंगत आणखी वाढविली. प्रथमेश परब यांनी चंद्रपूरकरांना भेटून आनंद व्यक्त केला. यावेळी त्याला पाहण्यासाठी चंद्रपूरकर युवक, युवतींनी मैदानावर मोठी गर्दी केली. आमदार प्रतिभाताई धानोरकर Mla Pratibha Dhanorkar यांनी त्याचा सत्कार केला. Marathi Cine actor Prathamesh Parab won the hearts of the audience at Bhau’s Dandiya Mahotsav;  Opposition leader Vijay Wadettiwar’s presence in Dandia

दांडियात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची उपस्थिती

चंद्रपुरातील सर्वात तरुणांच्या आवडीचा दांडिया असलेला भाऊचा दांडियात काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित राहून दांडियाचा आनंद घेतला. याप्रसंगी काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव आशिष दुवा, माजी आमदार अतुल देशकर, जिल्हा परिषद माजी सदस्य संजय गजपुरे, माजी महापौर राखीताई कंचर्लावार, चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती माजी उपसभापती रणजित डवरे, निलेश ऍलनटीवार, संदीप बुरेवार, हरिदास गुज्जलवार, वर्षा ठाकरे, डॉ. सचिन धगडी, आशिष येरगुडे, अमित येरगुडे, राहुल बदखल, वसंत असूतकर, गजानन खपणे, उदय रायपुरे, मोहन जोगी, सुनील सोमलकर यांच्या याप्रसंगी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular