Many youths from Pombhurna taluka have joined the MNS party
चंद्रपूर :- आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत, बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील पोंभूर्णा तालुक्यातील अनेक युवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हातात घेत मनसे मध्ये पक्ष प्रवेश केला. Political News
मनसेचे पोंभूर्णा तालुका अध्यक्ष आकाश तिरुपतीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मनसेचे जिल्हा सचिव (बल्लारपूर विधानसभा) किशोर मडगूलवार तथा मनविसे जिल्हाउपाध्यक्ष कुलदिप चंदणखेडे यांच्या संकल्पनेतुन पोंभूर्णा तालुक्यातील अनेक युवकांनी मनसेचा झेंडा हाती घेतला.
महाराष्ट्रात सर्वत्र निवडणुकांचे बिघूल वाजले असुन येणाऱ्या काहि दिवसात विधानसभेची सार्वत्रीक निवडणूक होवु घातली आहे, राजकिय पक्षाणी आपआपल्या परीने येणाऱ्या विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली असून युवकांनी मनसेचा झेंडा हाती घेत आपले कौल महाराष्ट्राच्या परीवर्तणाला देण्याचे निर्धार केला असल्याचे दिसुन येत आहे. Many youths from Pombhurna taluka have joined the MNS party
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरीत होऊन राजसाहेबांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेऊन पोंभूर्णा तालुक्यातील यूवकांनी मनसेचा झेंडा हाती घेत पक्षप्रवेश केला, दिनांक 21 सप्टेंबर रोज शनिवारला मनसेचे जिल्हाध्यक्ष मनदिप रोडे, मनसेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, यांच्या मार्गदर्शनात पोंभूर्णा तालुक्यातील अनेक युवकांनी मनसेमध्ये पक्षप्रवेश करीत राजसाहेबांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याची ग्वाही दिली.
नव्याने पक्षप्रवेश केलेल्या युवकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर पदाधिकार्यांनी उपस्थीतांना मागदर्षण करीत पक्षासाठी एकनिष्ठेने काम करा, येणाऱ्या काळात आपल्याला अपेक्षीत महाराष्ट्राचा नवनिर्माण झालेला दिसेल असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाचे आयोजन मनविसे तालुकाध्यक्ष आशिष नैताम, मनसेचे तालुका सचिव अमोल ढोले, मनविसे तालुका उपाध्यक्ष राजेश गेडाम यांनी केले असून पक्षप्रवेश सोहळ्यात मनसेचे जिल्हा सचिव किशोर मडगुलवार, मनविसे जिल्हाउपाध्यक्ष कुलदिप चंदणखेडे, मनसेचे पोंभूर्णा तालुकाध्यक्ष आकाश तिरुपतीवार, मनविसे पोंभूर्णा तालुकाध्यक्ष आशिष नैताम, मनसेचे तालुका सचिव अमोल ढोले, मनविसे तालुका उपाध्यक्ष राजेश गेडाम, मनसेचे पोंभूर्णा शहराध्यक्ष निखिल कन्नाके, मनसेविसे तालुका सचिव महेश राजु नैताम, शन्मुख देऊरमल्ले, शुभंम वांढरे,प्रथम चांदेकर मनसेचे पदाधिकारी तथा मनसैनिक प्रामुख्याने उपस्थित होते