Saturday, January 18, 2025
HomeEducationalअनुदानित शासकीय आदिवासी आश्रमशाळा संघटनेच्या मासिक सभेत कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्यावर चर्चा

अनुदानित शासकीय आदिवासी आश्रमशाळा संघटनेच्या मासिक सभेत कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्यावर चर्चा

Many problems of employees were discussed in the monthly meeting of Government Aided Tribal Ashram School Association Chandrapur

चंद्रपूर :- विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ सलग्न अनुदानित/ शासकीय आदिवासी आश्रमशाळा संघटना चंद्रपूरच्या कार्यकारिणीची मासिक सभा रविवार दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी चंद्रपूर जवळील साळवे रिसॉर्ट जुनोना तलाव येथे आयोजित करण्यात आली.

संघटनेचे अध्यक्ष श्री प्रमोद साळवे यांच्या अध्यक्षतेखाली सभेमध्ये आदिवासी आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या व प्रश्नाविषयी सविस्तर चर्चा संघटनेचे पदाधिकारी व सदस्य यांनी केली. संपूर्ण चंद्रपूर प्रकल्पातून अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांकडून आलेल्या समस्या व तक्रारी आणि सर्वच कर्मचाऱ्यांना संस्थाचालक तसेच प्रकल्प कार्यालयाकडून होत असलेला त्रास याबाबत सविस्तर मुद्देसूद चर्चा करून समस्यांची यादी तयार करण्यात आली. Government Aided Tribal Ashram School Association Chandrapur

यादीतील समस्या व इतर विषय सोडविण्यासाठी आमदार सुधाकर अडबाले सर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रकल्प अधिकारी यांच्या सोबत सभा घेऊन समस्या सोडविणार आहेत, त्या सभेमध्ये संघटनेचे पदाधिकारी व सदस्य सुध्दा उपस्थित राहून सभेतील चर्चेत सहभागी होवून, समस्या वारंवार का निर्माण होतात आणि त्या समस्या सोडविण्यासाठी प्रकल्प कार्यालयातील प्रशासन कोणती कार्यवाही करीत आहेत? अशाप्रकारचे प्रश्न प्रकल्प अधिकारी यांना विचारायचे आहे. असे दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या संघटनेच्या सभेत ठरले आहे.

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रकल्प कार्यालयात होणाऱ्या सभेमध्ये आमदार सुधाकर अडबाले MLA Sudhakar Adbale हे प्रकल्प अधिकारी यांच्या सोबत ज्या समस्यावर चर्चा करणार आहेत त्या समस्या पुढीलप्रमाणे आहेत.

(1) सर्वच आश्रमशाळांचा नियमित मासिक पगार प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपर्यंत झालाच पाहिजे.यासाठी मुख्याध्यापक यांनी पगार बील महिन्याच्या 15 ते 20 तारखे दरम्यान टाकावे.
(2) जे मुख्याध्यापक नेहमीच उशिरा पगार बील टाकतात त्यांच्यावर मा.प्रकल्प अधिकारी यांनी आजपर्यंत कोणती कारवाई केली आहे. अशा मुख्याध्यापकांची व त्यांच्या शालेय कामकाजाची चौकशी करून अहवाल तयार केला आहे काय.

(3) 4800 ग्रेड पे नुसार वेतन निश्चिती करिता काही माध्यमिक शिक्षकांनी सर्विस बुक प्रकल्प कार्यालयात सादर केले आहे. बरेच दिवस झाले पण त्यावर अजूनही कार्यवाही केली नाही आणि प्रकरण परतही केले नाही. याबाबत प्रकल्प कार्यालयात कोणती कारवाई सुरू आहे.यावर चर्चा करने.

(4) वार्षिक वेतनवाढ बाबत जुलै महिन्याचे पगार वेतनवाढ लावून टाकावे असे प्रकल्प अधिकारी यांनी पत्र काढले होते. परंतु काही दिवसानंतर प्रकल्प अधिकारी यांनी पलटी मारली व दुसरे पत्र संस्थाचालकांच्या सोईचे आणि कर्मचारी यांना त्रास होईल असे काढले आहे.यावर चर्चा करने.

(5) डिसीपीएस पावती,जीपीएफ पावती मिळाली पाहिजे याबाबत प्रकल्प कार्यालय काय कार्यवाही करत आहे.

(6) दहावी बारावी चा निकाल 80% च्या वर पाहिजे हि अट रद्द करावी. याबाबत चर्चा करने.

(7) आश्रमशाळेत अपेक्षित विद्यार्थी भरती झाली नाही, कमी विद्यार्थी आहे म्हणून संस्थाचालकाकडून वेतनवाढ रोखली जाते आणि प्रकल्प कार्यालय बघ्याची भूमिका घेत आहेत. अशाप्रकारे वेतनवाढ रोखण्यासाठी कोणत्या शासकीय नियमाचा आधार घेतला जातो.यावर चर्चा करने… इत्यादी अशा अनेक समस्या क्रमाने चर्चेत घेऊन समस्या सोडविणार आहे.

18 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या मासिक सभेत संघटनेचे अध्यक्ष श्री प्रमोद साळवे, सचिव मनोज आत्राम, कार्याध्यक्ष चंद्रभान वरारकर, सल्लागार संतोष केशेट्टीवार, प्रसिध्दी प्रमुख अमित देहारकर, कोषाध्यक्ष महेश ताजने, उपाध्यक्ष अरविंद राऊत, शंकर लोनगाडगे, प्रभाकर वडस्कर, सुरेश वरारकर, सहसचिव मानिकचंद ताडाम, सदस्य बजरंग जेणेकर, किशोर पिंपळशेंडे, विलास चुदरी, गोपाळ बोबाटे, अनुप मोहितकर, अरविंद साळवे संघटनेचे पदाधिकारी व सदस्य व इतर कार्यकर्ते सभेला उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular