Monday, March 17, 2025
HomeBussinessचंद्रपूर चे उद्योजक मनोज तांबेकर नाशिक येथे युवा उद्योजक पुरस्काराने सन्मानित

चंद्रपूर चे उद्योजक मनोज तांबेकर नाशिक येथे युवा उद्योजक पुरस्काराने सन्मानित

Chandrapur entrepreneur Manoj Tambekar honored with Youth Entrepreneur Award in Nashik

चंद्रपूर :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे MNS रोजगार स्वयंरोजगारचे चंद्रपूर चे जिल्हाध्यक्ष मनोज तांबेकर यांना युवा उद्योजक 2024 या पुरस्काराने नाशिक येथे सन्मानित करण्यात आले. Youth Entrepreneur 2024 Award

एम उद्योजक परिवारातर्फे आयोजित युवा उद्योजक सन्मान सोहळा 2024 चे नाशिक येथील हॉटेल स्ट्रीट येथे आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात मनसेचे रोजगार-स्वयंरोजगारचे चंद्रपूर चे जिल्हाध्यक्ष मनोज तांबेकर यांचा नाशिक येथे युवा उद्योजक 2024 म्हणून मानचिन्ह देऊन अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर असोसिएशन चे अध्यक्ष श्री ललित बुब यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

मागील अनेक वर्षापासून मनोज तांबेकर एक सफल उद्योजक असून मनसेशी जुळलेले आहेत. मनोज तांबेकर यांच्या कार्यकर्तुत्वाची दखल घेऊन त्यांचा हा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून नाशिकचे माजी महापौर श्री अशोक मार्तंडक, मार्ग स्टार्ट अप इंडिया मेंटर चे सी.ई.ओ. श्रीकांत पाटील, श्री ललित बुब (अध्यक्ष- अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर असोसिएशन), विविध संस्थेच्या अध्यक्ष व संचालक असलेले डॉ. हेमंत दीक्षित, मनसेचे रोजगार स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष महेंद्र बैसाणे व इतर उद्योजक मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

श्री तुषार गिऱ्हे (महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, मनसे/ अध्यक्षा श्री शिवाय फाउंडेशन व उद्योजक) यांनी कार्यक्रमाला संबोधित करताना सर्वांचे आभार मानले. सोबतच उद्योग, रोजगार या विषयांवर मोलाचे मार्गदर्शन केले.

मनोज तांबेकर यांना युवा उद्योजक पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने त्यांच्यावर चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योग, राजकारण व सामाजिक क्षेत्रातून कौतुक व शुभेच्छा देण्यात येत आहेत.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular