Thursday, November 30, 2023
Homeकृषीमंडळनिहाय दुष्काळ लवकरच घोषीत होणार... फडणवासांची घोषणा ; दुष्काळी निकष वाढवले शेतकऱ्यांना...

मंडळनिहाय दुष्काळ लवकरच घोषीत होणार… फडणवासांची घोषणा ; दुष्काळी निकष वाढवले शेतकऱ्यांना मिळणार अधिकचा फायदा

Drought will soon be announced according to the board ; Increased drought criteria, farmers will get more benefits!

मुंबई :- राज्यात अनेक भागात दुष्काळी परिस्थिती आहे. मंत्रिमंडळ उपसमिती आता वेगवेगळ्या निकषांवर आधारित मंडळ स्तरावर जात आहे. लवकरच दुष्काळी मंडळांचीही घोषणा होईल, अशी माहिती Devendra Fadanvis उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

राज्य शासनाकडून केंद्राच्या निकषानुसार याआधी ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर केला होता मात्र दुष्काळाची गंभिरता लक्षात घेता राज्य सरकारने ईतर तालुक्यात मंडळ निहाय दुष्काळ जाहीर करन्यात आला आहे..यापुर्वी राज्य सरकारने ४० तालुक्यातील २६९ महसूल मंडळात दुष्काळ जाहीर केला होता. Mandal wise drought will be declared soon… Devendra Fadnawas’ announcement

मात्र याशिवाय अनेक भागात दुष्काळाची तीव्रता जाणवते आहे, अनेकांनी दुष्काळ जाहीर करण्याच्या मागण्या केल्या होत्या यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की

“केंद्राच्या निकषानुसार, राज्यातील ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला आहे. यावरून झालेल्या टीकेनंतर मंत्रिमंडळ बैठकीत ९०० मंडळनिहाय दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला.”

याबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कुलाबा येथील पालावारची दिवाळी’ या कार्यक्रमावेळी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.
उपमुख्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे अधिकाधिक भागातील दुष्काळाच्या सावटाला आता राज्यशासनाची मदत मिळण्यास सोपे होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular