Sunday, December 8, 2024
Homeक्रीडा व मनोरंजन'मानाचे हळदी-कुंकू' कार्यक्रम संपन्न ; नानाजी नगर महिला मंडळ व जनविकास सेना...
spot_img
spot_img

‘मानाचे हळदी-कुंकू’ कार्यक्रम संपन्न ; नानाजी नगर महिला मंडळ व जनविकास सेना महिला आघाडीचा संयुक्त उपक्रम

Manache Haldi-Kunku’ program completed ;  Joint initiative of Nanaji Nagar Mahila Mandal and Jan Vikas Sena Mahila Aghadi

चंद्रपूर :- नागपूर रोडवरील नानाजी नगर येथील सार्वजनिक दत्त मंदिराच्या पटांगणात 19 जानेवारीला सायंकाळी 5 ते रात्री 9 वाजे दरम्यान ‘मानाचे हळदी-कुंकू व वाण वाटप’ कार्यक्रम संपन्न झाला. नानाजी नगर महिला मंडळ व जनविकास सेना महिला आघाडी तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

विशिष्ट महिलांना ह्ळदी-कुंकू कार्यक्रमापासून अलिप्त ठेवणाऱ्या जुन्या अनिष्ट चाली-रितींना फाटा देत सर्वच महिलांचा सन्मान करण्याच्या हेतुने मागील वर्षी पहिल्यांदा मानाचे हळदी कुंकू कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सलग दुसऱ्या वर्षी या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करून सर्व महिलांचा सन्मान करण्यात आला.

राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला वंदन करून उपस्थित महिलांनी कार्यक्रमाला आरंभ केला. वडगाव प्रभागातील 500 च्या वर महिलांनी या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता माधुरी शास्त्रकार,संगिता पाहुणे,मनिषा बोबडे,प्रविणा बरडे,शुभांगी गावंडे,अलका लांडे,सपना राणा, रमा देशमुख, वैशाली हिवकर, जयश्री लांडे, संगिता वानखडे ,रंजना घुमे, मनिषा गावंडे,चेतना वाढई,मिना पारखी,योगिता नक्षिणे,कुंदा देशमुख,सुमन बोधडे,अनुराधा हजारे,मंजुषा बोबडे,सुनिता वरगंटीवार,शुभांगी घुमे,शशिकला पाचभाई,स्वाती घुमे,ज्योती येरगूडे,गायत्री बोरीकर यांनी अथक प्रयत्न केले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular