Thursday, April 24, 2025
HomeAssembly Electionआ. सुभाष धोटेंच्या प्रचारार्थ राजुऱ्यात भव्य रॅली व जाहीर सभा.

आ. सुभाष धोटेंच्या प्रचारार्थ राजुऱ्यात भव्य रॅली व जाहीर सभा.

Make him victorious again for the overall development of the area: MLA Subhash Dhote

चंद्रपूर :- राजुरा येथे महाविकास आघाडी समर्थित भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या प्रचारार्थ भव्य रॅली व जाहीर सभा हजारो नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली. Make him victorious again for the overall development of the area

यावेळी सभेला संबोधित करताना आ. सुभाष धोटे म्हणाले की, भाजप व महायुती सरकार च्या काळात सोयाबीन, कापूस व अन्य शेतमालांचे भाव कोसळले, राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, दररोज ७ शेतकरी आत्महत्या होत आहेत. महिलांवरील अत्याचार, महागाई, बेरोजगारी वाढली. १५ हजार शाळा बंद पडल्या. महाराष्ट्रातील मोठे उद्योग पळवून गुजरातला नेले. तर दिल्लीमध्ये ३ काळ्या कायद्यांविरोधात आंदोलनादरम्यान शेकडो शेतकरी शहिद होत असतांना स्वतःला शेतकर्‍यांचा कैवारी म्हणवून घेणारे नेते मात्र भाजपच्या मांडीला मांडी लावून त्याचे समर्थन करीत होते. मी येवढे पुल, रस्ते बांधले म्हणून लोकांना उल्लू बनवित आहेत. जर यांनीच सर्व केले तर आम्ही जे एवढे पुल, रस्त्यांची कामे केली ती शिल्लक कशी राहीलीत याचं उत्तर त्यांच्याकडे नाही. १५ वर्षाच्या काळात फक्त घराघरात भांडणे लावून पोलीस स्टेशन मध्ये गुण्हात वाढ केली. विज बिल भरू नका म्हणून शेतकऱ्यांना भडकवले नंतर त्या बिचार्‍या शेतकऱ्यांना व्याजासकट बील भरावे लागले हे विसरू नका. तेव्हा अशा भुलथापांना न भुलता क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी मला पून्हा एकदा प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन केले.

ते पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने देश चालतो परंतू हे लोक कुठे तरी त्या संविधानाला मानीत नाहीत म्हणून बटेंगे तो कटेंगे असे नारे देतात पण या पुरोगामी महाराष्ट्रात हे चालणार नाही.

लोकं ज्याला पार्सल म्हणतात त्याचा फोटो सुध्दा पंतप्रधानांच्या चिमूर च्या सभेत नव्हता, सभेत एंट्री ही दिली नाही. शेतकरी संघटनेचे नेते १५ वर्षात आपल्या जन्म गावावरचा चिखलगाव असा जो सिक्का लागला होता तो मिटवू शकले नाहीत. तेथे आमच्या मदतीने, स्वतःच्या संकल्पनेतून आमच्या काँग्रेसच्या युवा नेत्यांनी स्मार्ट गाव बनवून दाखविले आहे. आणि आता निवडणूका डोळ्यासमोर ठेवून ते लोकांना मुर्ख बनविण्यासाठी मी हे केलं मी ते केलं असं सांगत फिरत आहेत. तेव्हा शेवटी काळी म्हणून मतं मागणाऱ्यांना न भुलता महाविकास आघाडी च्या पंचसूत्रीचा विचार करून पंजा चिन्हा समोरील ३ नंबरचे बटण दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.

यावेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते सुभाष सिंग गौर, विनोद दतात्रय, स्वामी येरोलवार, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, सय्यद सकावत अली, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, सुनिल देशपांडे, संतोष गटलेवार, शिवसेना (उभाठा) चे नितीन पिपरे, संतोष वैरागडे, राष्ट्रवादी (श. प) चे आशिफ सय्यद, निर्मला कुडमेथे, कुंदा जेणेकर, संध्या चांदेकर, काँ. अनुसूचित जाती विभाग तालुकाध्यक्ष कोमल फुसाटे यासह काँग्रेस, शिवसेना (उभाठा), राष्ट्रवादी (श. प), यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारोंच्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन जिल्हा महासचिव एजाज अहमद यांनी केले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular