Monday, November 4, 2024
HomeAccidentकॅन्सरग्रस्त रुग्णाला महेश मेंढे यांनी केले आर्थिक सहाय्य
spot_img
spot_img

कॅन्सरग्रस्त रुग्णाला महेश मेंढे यांनी केले आर्थिक सहाय्य

Mahesh Mendhe provided financial support to a cancer patient

चंद्रपूर :- महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सदस्य आणि सामान्य गोरगरीब जनतेविषयी प्रेम आणि जिव्हाळा तथा सामाजिक जाणीव असलेले नेते म्हणून प्रतिमा असलेले महेश मेंढे यांना काँग्रेस कार्यकर्त्याकडून शिला ठेमस्कर या एक गरीब असून त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असून त्या कॅन्सर ने आजारी असून त्यांना मदतीची गरज आहे अशी माहिती मिळाली तेव्हा महेश मेंढे लोकसभेत काँग्रेसच्या उमेदवार खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचे लोकसभेत काम करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांचे आभार व सत्कार कार्यात ग्रामीण भागात व्यस्त असतांना आरोग्याविषयी मदतीसाठी फोन येताच क्षणाचाही विलंब न लावता सर्व कार्यक्रम मध्येच सोडून मदतीसाठी सरसावले.

महेश मेंढे यांनी शीला ठेमस्कर या कॅन्सर पीडित महिलेला धीर देत आर्थिक सहाय्य केले. कुटूंबियांची आस्थेने विचारपूस केली. मुलींच्या शिक्षणाकरिता मदत लागल्यास मदत करण्याचे सुध्दा यावेळी महेश मेंढे आश्वासन दिले.

महेश मेंढे यांची यानिमित्ताने आरोग्याविषयी आणि शिक्षणाविषयी असणारी तडफड दिसून आली. महेश मेंढे नेहमीच शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, सार्वजनिक कार्यक्रमात रवा साखर, भोजनदान वाटप तसेच पावसाळ्यात गरीब आणि गरजू जनतेला छत्री वाटप कार्यक्रम करीत असल्याचे दिसून येतात तसेच गरजूंना आर्थिक मदत करतांनाही दिसून येतात,
आज मात्र प्रत्यक्षात आरोग्यासाठी सर्व कामाचा व्याप सोडून मदतीसाठी तत्परतेने धावून आल्याने महेश मेंढे यांचे नाव बाबूपेठ परिसरात कुतूहलाने घेतले जात आहे.

यावेळी महेश मेंढे यांच्या सोबत वैशाली गेडाम, गौतम गेडाम, चरणदास दुर्गे, बापूजी पिंपळे, शिशिम पाटील, बादल रामटेके आदींची उपस्थिती होती.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular