Maharashtra Day celebrated with enthusiasm by Infant Jesus Society
चंद्रपूर :- इन्फंट जिजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जिजस इंग्लिश हायस्कूल, कल्याण काॅलेज आँफ नर्सिंग, रामचंद्रराव धोटे कला, वानिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, रामचंद्रराव धोटे ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने १ मे महाराष्ट्र दिन Maharashtra Foundation Dayतथा कामगार दिनाचे Workers Dsy औचित्य साधून ध्वजारोहण करण्यात आले. Flag Hoisting
यावेळी कल्याण काॅलेज आँफ नर्सिंगचे प्राचार्य संतोष शिंदे यांच्या हस्ते सकाळी ठिक ७. ४५ वाजता ध्वजारोहण करण्यात आले.
या प्रसंगी रामचंद्रराव धोटे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रफुल्ल शेंडे, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापक रफिक अन्सारी यासह इन्फंट जिजस सोसायटी द्वारा संचालित सर्व शाळा, महाविद्यालये प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.