Give space to those vendors on footpaths to do business: Mahanagara BJP’s statement to Chandrapur Municipal Corporation
चंद्रपूर :- येथील बंगाली कॅम्प परिसरातील फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या विविध वस्तू व जीवनावश्यक साहित्य विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी महानगर भारतीय जनता पार्टीने Bjp महानगर पालिका प्रशासनाकडे MNC Chandrapur निवेदन देऊन केली आहे. Foothpath Vendors
यावेळी भाजपा महानगर महामंत्री ,प्रज्वलंत कडू, डॉ.मंगेश गुलवाडे, किरण बुटले, भाजपा नेते रेणू घोडेस्वार व अजय सरकार यांची उपस्थिती होती.
यावेळी पावडे म्हणाले, मनपा प्रशासनाच्या माध्यमातुन करण्यात येणाऱ्या अतिक्रमणच्या कार्यवाहीचा फटका फुटपाथ वरील व्यवसायिकांना सोसावा लागत आहे. अनेक वर्षापासुन बंगाली कॅम्प येथील रस्त्यावर व्यवसाय करत असलेले भाजीपाला, फळ विक्रेते व ठेलेवाले यांचे कुटुंब कारवाईमुळे उघड्यावर आले आहे.