Thursday, November 30, 2023
Homeक्रीडा व मनोरंजनमहाकाली पालखी नगर प्रदक्षिणा यात्रेत विविध सामाजिक सेवाभावी संस्थांनी दिली सेवा.. शोभायात्रेत...

महाकाली पालखी नगर प्रदक्षिणा यात्रेत विविध सामाजिक सेवाभावी संस्थांनी दिली सेवा.. शोभायात्रेत सहभागी भक्तांसाठी शितपेय आणि पाण्याची व्यवस्था

Mahakali palkhi nagar pradakshina yatra served by various social charitable organizations.                                                    चंद्रपूर :- श्री माता महाकाली महोत्सव निमित्त Mata Mahakali festival निघालेल्या महाकाली माता पालखी नगर प्रदक्षिणा शोभायात्रेत विविध सामाजिक सेवा भावी संस्थाच्या वतीने सेवा देत शोभायात्रेत सहभागी मातेच्या भक्तांसाठी शित पेय आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

23 आॅक्टोंबरला निघालेल्या माता महाकाली नगर प्रदक्षिणा द्वारे पाच दिवस चाललेल्या श्री. माता महाकाली महोत्सवाचा समारोप करण्यात आला. या दरम्यान शोभायात्रेत सहभागी मातेच्या भक्तांसाठी महाकाली मंदिर जवळ रघुविर अहिर मित्र परिवारच्या वतीने पाणी आणि शित पेय वाटप करण्यात आले.

अंचलेश्वर मंदिर जवळ महानगरपालीका प्रशासनाच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. गिरणार चौक येथे रामु तिवारी मित्र परिवारच्या वतीने पिण्याचे पाणी आणि शितपेयाची व्यवस्था करण्यात आली होती. जैन मंदिर येथे राहुल पुगलिया मित्र परिवारच्या वतीने ही मातेच्या भक्तांसाठी शितपेयाची व्यवस्था करण्यात करण्यात आली होती.

लोकमान्य टिळक विद्यालय जवळ मुस्लिम हक्क संघर्ष समितीच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच बोहरा समाज आणि किदवाई स्कृलच्या वतीनेही पालखी यात्रेत सहभागी भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची व शितपेयाची व्यवस्था करण्यात आली होती.

यासह ईतर अनेक सामाजिक संघटनांनी, व्यापारी मंडळांनी अल्पोपहाराची व्यवस्था केली होती. यासर्व सेवाभावी संस्थेचे श्री महाकाली माता सेवा समितीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular