Looting of a merchant in Chandrapur
Ramnagar police arrested 3 accused
चंद्रपूर (चंद्रपूर टुडे) :- शहरातील प्रतिष्ठित व्यावसायिक भगवान ऑटोमोबाइल्स चे संचालक दुकान बंद करून आपल्या भावासोबत घरी परत येत असतांना रात्रौ सिंधी कॉलनी तील शारदा चौकात वाटमाऱ्यांनी गाडी अडवून गाडी व गाडीत असलेले 80,000 रुपये लंपास केले, Chandrapur Crime रामनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने तांत्रिक आणी कौशल्यपूर्ण तपास करून तीन आरोपिंना अटक करीत गुन्ह्यात वापरलेले वाहन हत्यार नगदी रोख असे एकूण 60,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Looting of a merchant in Chandrapur
शहरातील वासुदेव हरनाम जाधवानी, रा. प्लॉट क. 14, आनंद नगर, रामनगर चंद्रपूर व त्यांचे भाऊ जगदीश जाधवानी मिळुन नागपूर रोडवरील भगवान ऑटोमोबाईल चे दुकान बंद करून त्यांचे ज्युपीटर मोपेड क्र. एम.एच. 49 एक्स 4080 वाहणाने घराकडे जाण्यास निघाले असता शारदा चौक, सिंधी कॉलनी जवळ पोहचले असता तिन अनोळखी इसम चेह-यावर कापड बांधुन पांढ-या रंगाच्या स्कुटीने गाडी समोर येवून रात्रो दरम्यान रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी त्यांना अडवुन चाकुचा धाक दाखवून जाधवानी यांचे ताब्यातील मोपेड वाहन जबरदस्तीने हिस्कावून स्कुटरचे डिक्कीमध्ये असलेले 80,000 रूपये असे एकुण 95,000 रुपयांचा माल जबरदस्तीने चोरून पळुन गेले अशी तक्रार 8 जुलै 2024 रोजी रामनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. Ramnagar Police Station
तक्रारीवरून पोस्टे रामनगर येथे अप क. 702/2024 कलम 309 (4), 3(5) भारतीय न्याय संहीता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्हयाचे तपास रामनगर पोलीस स्टेशन चे डि.बी. पथकातील प्रमुख स.पो.नि देवाजी नरोटे हयांचेकडे देण्यात आला. तपासी अधिकारी यांनी गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचारी यांचे माध्यमातून पोस्टे परीसरात अनोळखी आरोपींचे शोधार्थ मुखबीर लावले, घटनास्थळ परीसरातील सिसीटीव्ही कॅमेरे CCTV Camera चेक करून अनोळखी आरोपीचे फोटो प्राप्त करून, सदर फोटो हे पोलीस स्टेशन परीसरात लोकांना दाखवून अनोळखी आरोपीतांची माहिती घेत असता, सदर फोटो मधील आरोपीशी मिळताजुळता इसम हा जलनगर वार्ड परीसरात फिरत असल्याबाबत डि.बी. पथकास माहिती मिळताच डि.बी. पथकाने सपळा रचुन आरोपी फैजान तसलिम शेख, वय 21 वर्ष, रा. जलनगर वार्ड हयास ताब्यात घेवून त्याला गुन्हयासंबंधाने विचारपुस केली असता त्याने व त्याचे इतर साथीदार शहजाद अल्ताफ शेख, वय 27 वर्ष, रा. सहारा पार्क समोर हनीसा अपार्टमेंट राजनगर चंद्रपूर, दिलशान सदीक काजी, वय 27 वर्ष, रा. जलनगर वार्ड चंद्रपूर हयांनी मिळुन सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले.
यावरून डि.बी. पथकाने तिन्ही आरोपीना अटक करून त्यांचेकडुन चोरीस गेलेली मोपड गाडी, गुन्हयात वापरलेली गाडी, गुन्हयात वापरेले हत्यार, नगदी रोख असा एकुण 60,100 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन चंद्रपूर, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गाडे, पो.नि. यशवंत कदम, तसेच गुन्हे शोध पथक रामनगर चे सपोनी देवाजी नरोटे, पोउपनि मधुकर सामलवार, पोउपनि दिपेश ठाकरे, पोहवा सचिन गुरनुले, पोहवा पेत्रस सिडाम, प्रशांत शेंदरे, आनंद खरात, शरद कुडे, लालु यादव, पोशि हिरालाल गुप्ता, रविकुमार ढेंगळे, संदीप् कामडी, पोशि विकास जुमनाके, पोशि विकास जाधव, पोशि पंकज ठोंबरे, पोशि प्रफुल पुप्परलवार, मपोहवा मनिषा मोरे यांनी कार्यवाही केली.