‘Long March’ from Nashik to Nagpur for various tribal demands; Akhil Bharatiya Adivasi Vikas Parishad office bearers information in a press conference
चंद्रपूर : आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर नाशिक ते नागपूर असा पैदळ लाँग मार्च काढण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय आदिवासी युवा विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष अतुल कोडापे यांनी मंगळवारी चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
५ डिसेंबर राजी नाशिकच्या शिल्लर येथून लाँग मार्च प्रारंभ झाला. तर ११ डिसेंबर रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर मोर्चा धडकणार आहे. एसटी प्रवर्गात धनगर समाजाचा समावेश करण्यात येऊ नये, सर्वोच्च न्यायालयाच्या ६ जुलै २०१७ च्या निर्णयाची जलदगतीने अमलबजावणी करण्यात यावी, आदिवासींची संख्या कमी करण्यासाठी चालविलेली डी लिस्टिंग बंद करण्यात यावी, कंडिशनली व्हॅलिडिटी रद्द करण्यात यावी, बेरोजगार युवकांना शून्य व्याजाने कर्ज उपलब्ध करून द्यावे, शाळेच्या खाासगीकरणाचा निर्णय रद्द करण्यात यावा, खासगी संस्थांमध्येही आदिवासींना आरक्षण देण्यात यावे, आदिवासींचा संपूर्ण बॅकलॉग भरण्यात यावा, आदिवासीचे संरक्षणार्थ असलेला ॲट्रासिटी ॲक्ट आणखी कठोर करण्यात यावा आदी मागण्यांकडे या मोर्चाच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात येणार असल्याचे यावेळी कोडापे यांनी सांगितले. यावेळी स्वप्निल धाबाडे उपस्थित होते.