Local workers started indefinite strike against cmpl company
चंद्रपूर :- सी. एम.पी. एल. माती उत्खनन या कंपनीतील कार्यरत स्थानिक कामगारांना कंपनीचे काम संपल्याचे, सर्व कामगारांना पत्र पाठवून कामावरून डावलण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला आहे कारण सदर कंपनीचे दुसरे काम हे राजुरा विधानसभा क्षेत्र सास्ती येथे सुरु आहे.
कंपनीने स्थानिक कामगारांना कामावरून कमी केल्यास त्यांच्यावर तसेच त्याच्या परिवारावर वेळ येणार.स्थानिक कामगारांना कामावरून न काढता सास्ती येथे स्थलांतर करण्यात यावे.
याकरिता अनैशा वाहन चालक कामगार संघटना चे संस्थापक अध्यक्ष सुरज भाऊ उपरे तसेच सामजिक कार्यकर्ते भूषणभाऊ फुसे यांच्या नेतृत्वात राजुरा तहसील कार्यालयासमोर दिनांक 10 जून 2024 रोज सोमवार ला बहुजनांच्या महापुरुषांना अभिवादन करून बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आले.
बेमुदत धरणे आंदोलनात आंदोलनकर्ते आकाश ताकसांडे, ऋषी चौधरी, अजय इग्रपवार, साई कुमार मोगलीवार, राकेश चेनमेंवार, श्रीकांत जलावार, पांडुरंग मंगाम, आशिष पझारे, माणिक संजीव, दशरथ कोंडावार, मिथुन कांबळे, राहुल राठोड, विशाल सल्लम, संकेत भादिकर, शंकर काळे, प्रवीण जेल्लेल, प्रवीण चेनवेंनवार उपस्थित होते.
या प्रसंगी स्थानिक कामगारांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आता आंदोलन मागे घेणार नाही, असे सुरजभाऊ उपरे यांनी म्हटले,
तर सामाजिक कार्यकर्ता भूषणभाऊ फुसे यांनी चंद्रपूर जिल्ह्यात भूमिपुत्र व स्थानिक कामगारांवर ठेकेदार व उद्योजक,राजकीय पुढारी, शासन व प्रशासनाला हाताशी धरून सातत्याने अन्याय करत आहे, या अन्यायाविरुद्ध सतत आम्ही लढत राहू असे म्हटले.