Saturday, January 18, 2025
HomeCrime27 वर्षीय युवकाकडून दोन तलवारी जप्त

27 वर्षीय युवकाकडून दोन तलवारी जप्त

Chandrapur Local crime branch seized two swords from a 27-year-old youth

चंद्रपूर :- स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर च्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे माढेळी येथून दोन तलवार जप्त केल्या.

चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण राखण्यासाठी पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा विविध ठिकाणी छापे टाकीत हत्यार व अग्निशस्त्र जप्त करीत आहे. Crime News

वरोरा पोलीस ठाणे हद्दीतील माढेळी, हनुमान नगर येथील प्रतीक किन्हेकार (27) याचे कडे अवैध हत्यार असल्याची गोपनीय माहिती चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त झाली यावरून LCB स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून आरोपी प्रतीक किन्हेकार याला ताब्यात घेत त्याच्या घराची झडती घेतली असता घरात एक मोठी लोखंडी धारदार तलवार व एक लहान लोखंडी टोकदार तलवार आढळून आली. Local crime branch seized two swords

आरोपीवर भारतीय हत्यार कायदा अन्वये वरोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला, पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत. Chandrapur Police

सदर कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात पो.उप.नि विनोद भुरले, सफो. स्वामींदास चालेकर, पो. हवा. धनराज करकाडे, अजय बागेसर, प्रशांत नागोसे, दिनेश अराडे तसेच सर्व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular