Thursday, September 12, 2024
spot_img
spot_img
HomeCrimeचंद्रपुरात एलसीबी ने केला 7.68 ग्रॅम एमडी जप्त

चंद्रपुरात एलसीबी ने केला 7.68 ग्रॅम एमडी जप्त

Local crime branch seized 7.68 grams of MD in Chandrapur

चंद्रपूर :- स्थानिक गुन्हे शाखेने LCB Chandrapur गोपनीय माहितीच्या आधारे एमडी (मॅफोड्रॉन) MD विक्री करणाऱ्या आरोपीची झडती घेत 7.68 ग्रॅम एमडी (मॅफोड्रॉन) व दुचाकी मोपेड असा एकूण 53,040/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत, आरोपी शेख नदीम शेख रहीम, रा. बगड खिडकी, चंद्रपूर याला रामनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील बगड खिडकी परिसरात आरोपी दुचाकीने एमडी (मेफोड्रॉन) पावडर विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त झाली यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परिसरात सापळा रचून आरोपी शेख नदीम शेख रहीम, रा. बगड खिडकी, चंद्रपूर याला ताब्यात घेत त्याची अंगझडती घेतली असता पॅन्टच्या खिशात 7.68 ग्रॅम एमडी (मॅफोड्रोन) आढळून आले यावरून स्थानिक गुन्हे शाखेने त्याला ताब्यात घेत एमडी व ऍक्टिवा मोपेड असा एकूण 53040/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत आरोपीला पुढील कारवाईकरिता रामनगर पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले.

सदर कार्यवाही सुदर्शन मुम्मका, पोलीस अधीक्षक चंद्रपुर, रीना जंनबधु, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रपुर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षल एकरे, पोलीस उप निरीक्षक विनोद भुरले, पोलीस अंमलदार संतोष येलपुलवार, नितीन रायपुरे, अमोल सावे, गोपाल आतकुलवार, चालक पोलीस अंमलदार रूषभ बारसिंगे स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांनी केली.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular