Sunday, March 23, 2025
HomeCrimeस्थानिक गुन्हे शाखेचा प्रतिबंधित तंबाखूच्या गोदामावर छापा ; 2 लाख 37...

स्थानिक गुन्हे शाखेचा प्रतिबंधित तंबाखूच्या गोदामावर छापा ; 2 लाख 37 हजारांचा तंबाखू जप्त

Local crime branch raids warehouse of banned flavored tobacco
2 lakh 37 thousand tobacco seized

चंद्रपूर :- स्थानीक गुन्हे शाखेच्या LCB Chandrapur पथकाने मध्यरात्री चिमूर पोलीस स्टेशन हद्दीतील नेरी येथील एका गोदामावर धाड टाकीत Police Raid प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, पान मसाला 2,37,645 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, यात किराणा दुकानादार जगदीश आष्ठनकर याला ताब्यात घेण्यात आले. banned flavored tobacco Seized

स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीवरून चिमूर पोलीस स्टेशन हद्दीतील नेरी गावातील गजानन चांदेकर यांच्या शेतशिवारात दिनांक 21 फेब्रुवारी रोजी रात्रो 12 वाजता गोदामावर छापा टाकला असता, गोदामात महाराष्ट्र शासनाने पतिबंधीत केलेला किंमत 1,14,800/-रु 11 प्लॅस्टीक चुंगडीत एकुण 700 पाउज प्रत्येकी 200 ग्रॅम होला हुक्का शिशा तम्बाखु ने भरलेले सिलबंद पाउज (प्रति पाउज 164 रू. प्रमाने), किंमत 27,960/-रु दोन प्लॅस्टीक चुंगडीत एकुण 233 पुडे प्रत्येकी 30 पाउज असलेले मुसाफिर पान मसाल्याचे सिलबंद पाउज (प्रति पुडा 120 रू. प्रमाने), किंमत 6,400/-रु एका प्लॅस्टीक चुंगडीत एकुण 10 पुढे प्रत्येकी 400 ग्रॅम इगल हुक्का, शिशा तम्बाखू ने भरलेले सिलबंद पुडा (प्रति पुडा 640 रू. प्रमाने), किंमत 2,720/-रु एका प्लॅस्टीक चुंगडीत एकुण 8 पाउच प्रत्येकी 200 ग्रॅम इगल हुक्का शिशा तुम्बाखु ने भरलेले सिलबंद पाउज (प्रति पाउज 340 रू. प्रमाने), किंमत 17,365/-रु एका प्लॅस्टीक चुंगडीत एकुण 23 नग डब्बे प्रत्येकी 200 ग्रॅम मजा 108 सुगंधित तुम्बाकूने भरलेले सिलबंद डब्बे (प्रति नग 755 रू. प्रमाने), किंमत 32,900/-रु दोन प्लॅस्टीक चुंगडीत एकुण 140 नग डब्बे प्रत्येकी 50 ग्रॅम मजा 108 सुगंधित तुम्बाकूने भरलेले सिलबंद डब्बे (प्रति नग 235 रू. प्रमाने), किंमत 29,500/-रु एका प्लॅस्टीक चुंगडीत एकुण 25 खरड्‌याचे बॉक्स मध्ये रजनिगंधा पान मसाला मिनी पॅक कंपणीचे बॉक्स प्रत्येकी बॉक्स 265 ग्रॅम ने भरलेले सिलबंद खरड्याचे बॉक्स (प्रति बॉक्स 1,180 रू. प्रमाने), किंमत 6,000/-रु एका प्लॅस्टीक चुंगडीत एकुण 50 पॅकेट पान पराग प्रमियम पान मसाला कंपणीचे पॅकेट प्रत्येकी पॅकेट 90 ग्रॅम ने भरलेले सिलबंद पॅकेट (प्रति पाउज 120 रू. प्रमाने) असा एकुण 2,37,645/- रुपये चा माल आढळून आला.

यात आरोपी जगदीश काशिनाथ आष्टनकर वय 43 वर्षे धंदा- किराणा दुकान मालक रा. टिळक वार्ड, नेरी ता. चिमूर जि. चंद्रपूर व आदिल कुरेशी, रा. नागभीड या आरोपीनी संगनमत करून लोकांच्या जिवीताला हानीकारक नशाकारक व अहितकारक अन्न पदार्थ सुगंधित तम्बाकू व पान मसाला अवैद्य रित्या आपले ताब्यात अवैधरीत्या विकीच्या उद्देशाने बाळगल्याने त्यांचेवर अप.क.91/2024 कलम 328,188,272,273,34 भादवी सहकलम 30 (2).26 (2), (अ).3.4.59 (1) अन्न व औषधी कायदा 2006 अन्वये गुन्हा नोंद करून जप्त मुददेमाल व आरोपी जगदीश आष्ठनकर यांना ताब्यात घेत पो.स्टे. चिमुर यांचे ताब्यात पुढील कार्यवाहीकामी देण्यात आले.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधिक्षक एम. सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, श्री. महेश कोंडावार, पोलिस निरिक्षक, स्थागुशा चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली, किशोर शेरकी, सपोनि, स्थागुशा, पोहवा सुरेंद्र महतो, पोहवा दिपक डोंगरे, नापोशि गणेश मोहुर्ले, पोअ गोपीनाथ नरोटे, पोअ सतिश बगमारे यांनी पार पाडली.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular