Sunday, April 21, 2024
HomeCrimeअवैध रेती तस्करीवर स्थानिक गुन्हे शाखेची नजर : 4 हायवा सहीत करोडोंचा...

अवैध रेती तस्करीवर स्थानिक गुन्हे शाखेची नजर : 4 हायवा सहीत करोडोंचा माल जप्त

Local Crime Branch keeps an eye on illegal sand smuggling
4 goods worth crores seized under the signature of Haiwa Truck

चंद्रपूर :- कोरपना पोलीस स्टेशन हद्दीतील नारंडा फाटा बस स्टॉप समोर स्थानिक गुन्हे LCB  Chandrapur शाखेने सापळा रचून अवैध रेतीची तस्करी करणारे 4 हायवा ट्रक जप्त करीत 6 आरोपींना ताब्यात घेत 1,83,20,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. Illegal sand smuggling

कोरपना तालुक्यात अवैध रेती तस्करी ची गोपनीय माहिती स्थानीक गुन्हे शाखेला प्राप्त झाली त्यावरून आज दिनांक 1 मार्च 2024 रोजी सापळा रचून हायवा ट्रक क्रमांक एम एच 34 बि जी 9520, एम.एच. 34 बि.झेड. 0221, एम एच 34 बि झेड 5773 व एम एच 34 बि झेड 9310 अशी चार वाहन तसेच चारही वाहनात प्रत्येकी 8 ब्रास रेती यांची एकूण अंदाजित किंमत 1,83,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी संजय निवृत्ती देवकाते, वय 50 वर्षे रा. पल्लेझरी, ता. जिवती, अंबादास राजु आत्राम, वय 30 वर्षे, रा. अंबेझरी, ता. जिवती, सुरज प्रभाकर कुमरे, वय 28 वर्षे, रा. लाठी, ता. गोंडपिपरी, अशोक धर्मराज राठोड, वय 26 वर्षे, रा.पाटण, ता. जिवती, सददाम वजिर शेख, रा. शेणगाव ता. जिवती व सचिन भोयर रा. गडचांदूर ता. कोरपणा, जि. चंद्रपूर यांना ताब्यात घेत कोरपना पोलीस स्टेशन येथे 40/2024 कलम 379, 34 भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Crime

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक, चंद्रपूर एम. सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली महेश कोंडावार, पोलीस निरिक्षक, स्थागुश, चंद्रपूर, विकास गायकवाड, सपोनि, स्थागुश चंद्रपूर, पोहवा नितेश महात्मे, पोहवा जमीर पठाण, अनुप डांगे, मिलींद चव्हाण, प्रसाद धुळगंडे आदी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदार यांनी पार पाडली.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular