Tuesday, March 25, 2025
HomeCrimeवरोरा येथे प्रतिबंधित अवैध सुगंधित तंबाखु तस्करांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

वरोरा येथे प्रतिबंधित अवैध सुगंधित तंबाखु तस्करांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

Local crime branch crackdown on banned illegal flavored tobacco smugglers in Varora

चंद्रपूर :-  जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशान्वये चंद्रुपर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा यांना दिले

त्याअनुशंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. महेश कोंडावार यांनी पथक नेमुन त्यांना अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

त्यानुसार आज दिनांक 14 मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गोपनिय माहीती प्राप्त झाली की, वरोरा पोलीस स्टेशन परीसरात नागपुर येथुन गाडी क्र. एम.एच. 34 सि.डी. 8540 या पांढ-या रंगाच्या कार मध्ये महाराष्ट्र प्रतिबंधित केलेला सुगंधित तंम्बाकू चा साठा भरुन चंद्रपुर कडे अवैधरित्या विक्रीसाठी वाहतुक करीत आहे.

अश्या खात्रीशीर खबरेवरुन नंदोरी टोल नाका ता. वरोरा येथे स्थानिक गुन्हे शाखेने नाकाबंदी करून सदर वाहनाची झडती घेतली असता 5,77,600/- रुपये किंमतीचा शासनाने प्रतिबंधित केलेला सुंगधित तंबाकु, टोयोटा कंपनीची चारचाकी वाहन अंदाजे किंमत 15,50,000 रुपये व दोन मोबाईल असा एकुण 21,27,600/- रुपये चा मुद्देमाल आढळून आल्याने जप्त करण्यात आला.

सदर प्रतिबंधित सुगंधित हा शासनाने प्रतिबंधित केलेला असल्याने आरोपी यांनी अवैधरित्या विक्रीकरीता वाहतुक करीत असता मिळुन आल्याने आरोपी मुकेश नगिनभाई कातरानी, वय 46 वर्षेधंदा – चालक व एक महीला दोन्ही रा. वार्ड क्र. 6 नेरी, दुर्गापुर ता.जि. चंद्रपुर यांचे विरुध्द पो.स्टे. वरोरा अप.क्र. /2024 कलम 328,188,272,273,34 भादंवी सह कलम 30 (2), 26 (2) (अ), 3, 4, 59 (1) अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम नुसार गुन्हा नोंद केला असुन पुढील कायदेशीर कारवाई करणेकरीता जप्त मुद्देमाल व आरोपी नामे मुकेश नगिनभाई कातरानी, चालक व एक – महीला यांना पो.स्टे. वरोरा यांचे ताब्यात देण्यात आले.

उपरोक्त कारवाई पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. महेश कोंडावार यांचे आदेशाने सपोनि मनोज गदादे, सपोनि किशोर शेरकी, यांचे गोपनिय माहीतीवरुन सपोनि गदादे, पोहवा धनराज करकाडे, स्वामीदास चालेकर, गजानन नागरे, अजय बागेसर, पोअं. प्रशांत नागोसे, चापोहवा दिनेश अराडे, स्थागुशा चंद्रपुर सायबर पोलीस स्टेशन चे पोअं उमेश रोडे, पो.स्टे. वरोरा येथील मपोशि किर्ती ठेंगणे यांनी सापळा रचुन यशस्वीरीत्या कारवाई केली.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular