Sunday, April 21, 2024
HomeCrimeरेती तस्कराविरुध्द स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; 3 ट्रॅक्टरसह 6 लाखांचा मुद्देमाल...

रेती तस्कराविरुध्द स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; 3 ट्रॅक्टरसह 6 लाखांचा मुद्देमाल जप्त

Local crime branch action against sand smugglers;  6 lakh worth of goods seized including 3 tractors

चंदपुर :- जिल्हयात अवैधरीत्या होत असलेल्या रेती – वाळु तस्करांवर आळा घालण्याकरिता पोलीस अधिक्षक, चंद्रपुर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष निर्देश दिले होते. Chandrapur Crime

त्यावरून मौजा वडगाव हद्दितून अवैधरित्या रेती वाहतुक होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला LCB प्राप्त झाली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक महेश कोंडावार यांनी विशेष पथक तयार करून त्यांना रेती / वाळु तस्कांविरुध्द कारवाई करण्याबाबत आदेश दिले. Sand Smugling

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर चे विशेष पथकाने आज दिनांक 6 मार्च 2024 रोजी मिळालेल्या गोपणिय माहीती वरून मौजा वडगाव हद्दितील ईरई नदी पात्रात सापळा रचुन तिथे एक ट्रक्टर क्र एम एच 34 एल 5325 हा रेती भरून जात असताना व ईरइ नदी पात्रात दोन टॅक्टर चोरीची रेती भरताना दिसले असता जाणारे टॅक्टरला हात दाखवुन थांबविले असता, तो ट्रक्टर तिथे थांबला व नदीपात्रात रेती चोरीचा प्रयत्न करीत असलेले दोन टॅक्टर पळण्याचा प्रयत्न करीत असता त्यांना ताब्यात घेण्यात आले.

गौन खनिज रेतीची संगणमताने चोरी व चोरीचा प्रयत्न करणारे आरोपी शुभम संभा गोवर्धन वय 29 वर्ष रा. अपेक्षा नगर वडगाव, चंद्रपुर, बालाजी महदेव जुमनाके वय 38 वर्षे रा. हनुमान मंदिर जवळ कोसारा चंद्रपूर, रमेश नामदेव बदखल वय 50 वर्षे रा. गुरूदेव नगर, कोसारा पडोली, चंद्रपूर, परमीदर सिंग कतार सिंग वय 55 वर्षे रा. भावना सोसायटी वडगाव चंद्रपूर यांचे कडून एकूण 6.03,500/- रू.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला व आरोपी विरुध्द रामनगर पोलीस ठाण्यात अप. क. 249/2024 कलम 379,511,34 भा.द.वी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर कामगिरी पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधू यांचे मार्गदर्शनात महेश कोंडावार, पो.नी. स्थानिक गुन्हे शाखा यांचे नेतृत्वात सपोनि किशोर शेरकी, पोउपनि विनोद भुरले, पोहवा संजय आतकुलवार, नापोअ संतोष यलपुलवार, पो.अ.गोपाल आतकुलवार, नितीन रायपुरे यांनी यशस्वीपणे केली.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular