Tuesday, March 25, 2025
HomeCrimeमुरमुऱ्याच्या पोत्यात मध्यप्रदेश ते गडचिरोली मद्याची वाहतूक ; स्थानिक गुन्हे शाखेची पर्दाफाश...

मुरमुऱ्याच्या पोत्यात मध्यप्रदेश ते गडचिरोली मद्याची वाहतूक ; स्थानिक गुन्हे शाखेची पर्दाफाश करीत कारवाई

Liquor transport from Madhya Pradesh to Gadchiroli in burlap sacks
A daring action by exposing the local crime branch

चंद्रपुर :- जिल्ह्यामध्ये पोलीस निरीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध मद्य विक्री तसेच निर्मीती व वाहतुक करणा-याविरोधात धडक मोहीम चंद्रपुर पोलीसांच्या वतीने राबविण्यात येत आहे त्याच मोहीमेच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे LCB पथक स्थापन केले असून सदर पथकाच्या माध्यमातुन मोठ्याप्रमाणात अवैधरित्या दारूची वाहतुक करणाऱ्यांची माहिती काढून त्यावर कार्यवाही सुरू आहे. Chandrapur Crime

आज दिनांक 7 मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनिय माहिती मिळाली की, एक बोलेरो पिकअप वाहन मध्यप्रदेश येथून गडचिरोली जिल्ह्यात अवैधरित्या दारूची वाहतुक करून विक्रीकरीता नेत आहे. सदर माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बल्लारपूर येथे सापळा रचला असता चंद्रपुर रोडने येणारी महिंद्रा वोलेरो पिकअप क्र. एम. एच. ३४ बी.जी. ४१२६ या वाहनास शिताफीने ताब्यात घेवून वाहनाची तपासणी केली असता वाहनात गोवा ब्रॅन्ड दारूनी भरलेल्या 180 एम.एल. च्या 39 पेट्या, एक पांढऱ्या रंगाची महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन क्र एम. एच. 34 बी.जी. 4126 व 2 नग मोबाईल असा एकूण 10,25,500/- रू. चा मुद्देमाल आढळून आला. दरम्यान मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोस्टे वल्लारपूर येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला असून आरोपी फारूख शेख मुमताज शेख, वय २१ वर्ष, धंदा ड्रायव्हर, रा. नुरानी नगर, लालकिल्ला गेट जवळ, महल, नागपूर, जिल्हा नागपूर, तुषार संतोष नेहारे, वय २३ वर्ष, धंदा मजुरी, रा. चिचभवन, वर्धा रोड, शांतीनिकेतन (झोपडपट्टी) नागपूर यांस पुढिल कार्यवाहीसाठी बल्लारपूर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले. Illegal liquor smuggling सदर मुद्देमाल कुठून आणला व कुठे चालला दावावतचा तपास सुरू आहे. Local Crime Branch

सदर कामगिरी पोलीस अधिक्षक, अपर पोलीस अधिक्षक यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात सपोनि एकरे, पोउपनि विनोद भुरले, पोहवा. संजय आतकुलवार, गोपाल आतकुलवार, नितीन रायपुरे, सायबर गुन्हे शाखेचे पोकॉ. राहुल पोंदे यांनी केली आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular