Thursday, September 12, 2024
spot_img
spot_img
HomeSport'लाईनमन दिन’ महावितरणच्या चंद्रपूर परिमंडलात साजरा

‘लाईनमन दिन’ महावितरणच्या चंद्रपूर परिमंडलात साजरा

‘Lineman’s Day’ celebrated at Chandrapur Circle of Msedcl (Mahavitaran)

चंद्रपूर :- राज्याला व देशाला प्रगतीच्या शिखरावर पोहोचोवीणाऱ्या व जनतेच्या जीवनात प्रकाश पोहोचवीणाऱ्या- वीजयंत्रणेत अदृश्य असलेल्या ‘विजेला’ Electricity सुरळीत ठेवण्यासाठी विजपुरवठा अबाधित ठेवण्यासाठी, अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या वीजक्षेत्रातील महिला व पुरुष तांत्रिक कर्मचाऱ्यांचा अर्थात लाईनमनचा Line men गौरव करण्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार दि. ४ मार्च हा दिवस ‘लाईनमन दिन’ Line men Day म्हणून देशभरात तदवतच महावितरणच्या चंद्रपूर परिमंडलातील सर्व २९ उपविभागात साजरा करण्यात आला.

आयोजित कार्यक्रमांमध्ये सर्वांना वीजसुरक्षेची शपथ देण्यात आली. मुख्य अभियंता श्री. सुनिल देशपांडे यांनी सर्वांना लाईनमॅन दिनाच्या शुभेच्छा दिल्या देत. “महावितरणच्या वीज वितरण व्यवस्थेमधील अत्यंत महत्वाचा घटक आहात ! जनमित्र हे ऊन, वारा, पाऊस तसेच इतर अत्यंत खडतर परिस्थितीत ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठ्यासाठी चोवीस तास वर्षाचे ३६५ दिवस अविरत सेवा देतात.

कधी,चंद्रपूरच्या कडकडते उन्ह अंगावर झेलत तर पुरात पोहून जात, धो- धो पावसात कर्तव्य पार पाडतात.
चंद्रपूर जिल्ह्याच्या रानावनात, गडचिरोली जिल्हा यासारख्या दुर्गामातीदुर्गम -आव्हानात्मक भौगोलिक परिस्थितीत महावितरणचे ‘आधारस्तंभ’ -जनतेच्या जीवनात प्रकाश पोहोचवीतात याचा मला सार्थ अभिमान आहे. आपले जीवनमान काळजी घ्या व दुरुस्ती कामात सुरक्षेशी तडजोड करू नका.

कारण तुमची वाट घरी तुमचा परिवार पाहत असतो तर, महावितरण साठी, महावितरणचा तुम्ही महत्वाचा ‘ दुवा ‘आहात’ असे ते म्हणाले.

मुख्य अभियंता यांनी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित केले व केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त बिजली योजना केंद्र शासनाच्या निर्देशानुसार एक लाख सोलर रूप टॉप Solar Roof Top चे लक्ष पूर्ण करण्याचे आवाहन केले.

श्रीमती संध्या चिवंडे, अधीक्षक अभियंता चंद्रपूर प्रविभाग, कार्यकारी अभियंता श्री. दाव्हेकर, श्री वैदकर सहाय्यक महाव्यवस्थापक चंद्रपूर परिमंडळ, श्री सुशील विखार, वरीष्ठ व्यवस्थापक चंद्रपूर परिमंडळ हे उपस्थित होते.

‘लाईनमॅन’, प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित, या ‘लाईनमॅन-दिनी’ उपविभाग १ अंतर्गत आपल्या सर्व लाडके अभियंते- वसंत हेडाऊ, साहिल टाके, सुमेध खणके, मिथुन मेश्राम, टिकेश राऊत, पराग हलमारे, रितेश ढवळे, प्रवीण शेंडे, अतुल रोडगे यांचे प्रती ‘लाईनमॅन’ यांनी देखील प्रेम व्यक्त केले.

सिरोंचा, मुल, गडचिरोली, कुरखेडा, जीवती, बल्लारशा, वरोरा व अनेक ठिकाणी लाईनमन दिनानिमित्त रॅली काढण्यात आली व सर्वांनी सुरक्षिततेची शपथ घेतली.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular