Library movement enriched reading culture – MLA Kishore Jorgewar Digital Transformation of Public Libraries: A Roadmap from Amrit Mahotsav to Amritkal Concludes Two-Day Workshop
चंद्रपूर :- वाचन हे ज्ञानाचे एक महत्त्वपूर्ण साधन आहे. पुस्तकांमधून आपल्याला विविध विषयांवरील माहिती मिळते. ग्रंथालय चळवळीने ही वाचन संस्कृती समृद्ध केली असून ग्रंथालयीन चळवळीचे प्रश्न सोडविण्याकरिता मी विधीमंडळामध्ये संसदीय आयुधांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
दि. ३० जून २०२४ रोजी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयामध्ये राजा राममोहन रॉय लायब्ररी फाउंडेशनच्या सहयोगाने श्री माता कन्यका सेवा संस्था चंद्रपूर द्वारा संचालित स्व. डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार रात्रपाळी महाविद्यालय, चंद्रपूर तथा जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय पातळीवरील कार्यशाळेच्या समारोपीय कार्यक्रमात आ. किशोर जोरगेवार बोलत होते.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष अनिल बोरगमवार, सुप्रसिद्ध कवयित्री पद्मरेखा धनकर, डॉ. सुधीर आष्टूंकर, डॉ. संजय भुत्तमवार, रत्नाकर नलावडे, प्राचार्य संतोष शिंदे आदीची प्रमुख अतिथी म्हणून मंचावर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, कोणत्याही क्षेत्रात कार्य करीत असलो तरी वाचन नियमित केल्याने आपली त्या-त्या क्षेत्रात विशेष प्रगती होते. आपण मतदार संघात ११ सुसज्ज अभ्यासिका तयार करत असून हा ग्रंथालय चळवळीचा भाग आहे. वाचनामुळे आपल्या विचारशक्तीला धार येते. आपल्याला विविध लेखकांच्या विचारसरणीचे आणि तत्त्वज्ञानाचे ज्ञान होते. त्यामुळे आपल्या तर्कशक्तीमध्ये वाढ होते. वाचनामुळे आपल्या भाषेचा विकास होतो. नवीन शब्द, वाक्यरचना आणि व्याकरणाच्या नियमांचे ज्ञान आपल्याला यातून मिळते. वाचन हे मानसिक स्वास्थ्यासाठी देखील महत्त्वपूर्ण आहे. वाचनामुळे आपल्याला विविध समाजांची, संस्कृतींची आणि परंपरांची माहिती मिळते. यामुळे आपली सामाजिक जाणीव वाढते, असे यावेळी आ. जोरगेवार म्हणाले.
यावेळी अध्यक्षीय भाषणामध्ये अनिल बोरगमवार यांनी ग्रंथालयाची समृद्ध वाटचाल व तिच्या समस्यांविषयी भाष्य केले. तर वाचनामुळे सकारात्मक ऊर्जा प्राप्त होऊन उन्नत समाजाची निर्मिती होते, असे मत कवयित्री पद्मरेखा धनकर यांनी व्यक्त केले. Digital Transformation of Public Libraries: A Roadmap from Amrit Mahotsav to Amritkal Concludes Two-Day Workshop
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य संतोष शिंदे यांनी केले. संचालन प्राध्यापक श्रीकांत साव यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉ. दीपाली दांडेकर यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्राध्यापक वृंद, ग्रंथालय कर्मचारी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.