Sunday, February 16, 2025
HomeCrimeLCB ची सुगंधीत तंबाखु तस्करांविरुध्द धडक कारवाई : चारचाकी वाहनासह 5 लाख...

LCB ची सुगंधीत तंबाखु तस्करांविरुध्द धडक कारवाई : चारचाकी वाहनासह 5 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त

LCB’s crackdown on flavored tobacco smugglers: four-wheeler seized with goods worth Rs 5 lakh

चंद्रपूर :- स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर च्या पथकाने पडोली येथे नाकाबंदी करीत प्रतिबंधित सुगंधीत तंबाखूची तस्करीच्या वाहनाची ताब्यात घेत 5,42,240 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. Crime

नागपुर मार्गे एका ईग्नीस कार क. MH34 BF 5220 मध्ये अवैधरीत्या सुगंधीत तंबाखु भरून चंद्रपुर कडे येणार असल्याची गोपनीय खबर स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त झाली त्यावरून स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर येथील पथकाने पोलीस स्टेशन पडोली चौकात नाकेबंदी केली असता एक पांढरी रंगाची ईग्नीस कार संशयास्पदरित्या चंद्रपुर कडे येतांना आढळून आली, त्यास थांबविण्यास सांगितले असता सदर कार रोडच्या बाजुला थांबली. कार चालकास नाव पत्ता विचारले असता त्याने आपले नाव यश राजु ईटनकर वय 19 वर्षे रा. जटपुरा वार्ड, चंद्रपुर असे सांगितले. Police Raid Padoli

सदर कारची झडती घेतली असता कारचे मागील डिक्कीत 6 बोरीमध्ये एकुण 660 ईगल हुक्का शिशा तंबाखु पॅकेट किंमत 42,240/-रू चा सुगंधीत तंबाखुचा माल तसेच चारचाकी कार किंमत 5,00,000/- रू असा एकुण 5,42,240/-रू चा सुगंधीत तंबाखुचा मुद्देमाल जप्त करून पोस्टे पडोली येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. Prohibited flavored tobacco smuggling

सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर येथिल पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, सपोनि हर्षल एकरे, सपोनि योगेश खरसान, पोउपनि. विनोद भुरले, पो.हवा. नितीन साळवे, प्रकाश बलकी, अजय बागेसर, नापोशि संतोष येलपुलवार, पोशि. नितीन रायपुरे, चापोहवा प्रमोद डंभारे यांनी केली आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular