Sunday, March 23, 2025
HomeCrimeगोवंश तस्कराविरूध्द LCB ची धडक कारवाई : 37 जनावरासह 30 लाखांचा मुद्देमाल...

गोवंश तस्कराविरूध्द LCB ची धडक कारवाई : 37 जनावरासह 30 लाखांचा मुद्देमाल जप्त

LCB’s crackdown on Cattle Smugglers         30 lakh worth of goods seized including truck, 34 animals freed

चंद्रपूर :- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाकाबंदी करीत गोवंश तस्काराची 14 चक्का ट्रक जप्त करीत 34 गोवंश जनावरांना मुक्त करीत एकूण 30,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. Cattle Smuggling

स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर LCB Chandrapur चे पथक दिनांक 9 मे चे रात्रौ गस्त पेट्रोलींग करित असता गोपनिय माहीती मिळाली की मुल मार्गे एक अवैद्यरित्या कतली करिता जनावरे कोंबून भरलेला ट्रक कं. एम.एच. 18 बि.जी. 0754 हा मुल कडून चंद्रपूर कडे येणार आहे. Chandrapur Crime

यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पंथकाने पोलीस स्टेशन रामनगर Ramnagar Police Station हद्दीतील मौजा लोहारा येथे नाकाबंदी करित असता एक ट्रक भरधाव वेगाने मुल कडून येताना दिसल्याने, सदर वाहनास थांबविण्याचा ईशारा केला असता, तो वाहन न थांबविता पळू लागला व धोकादायकरित्या गाडी चालवून लोहारा ते चंद्रपूर रोडवरील हनुमान मंदिरा जवळ आपले ताब्यातील वाहन सोडून पळून गेला.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करीत वाहन गाठले, वाहनाची पहाणी केली असता वाहनामध्ये एकुण 37 गोवंशीय जनावरे आणी 3 मृत जनावरे व एक टाटा कंपणीचा 14 चक्का वाहन कं. एम.एच. 18 बि. जी. 0754 चे असा एकूण किमंत 30,50,000/- रू. चा माल जप्त करण्यात आला असुन पुढील कारवाई करिता पोलीस स्टेशन रामनगर यांचे ताब्यात देण्यात आले.

वाहनामधिल 34 नग गोवंशीय जनावरे यांची देखरेख करणे करिता प्यार फांडेशन दाताळा यांचे ताब्यात देण्यात आले व 3 मृत गोंवशिय जनावरांचा पंचासमक्ष पशुवैद्यकीय अधिकारी यांचे कडून पोस्टमार्टम करून घेण्याचे सुचनापत्र देण्यात आले.

सदर कारवाई पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांचे नेतृत्वात स्था.गु.शा.चे पोहवा दिपक डोंगरे, नितीन साळवे, सुरेंद्र महतो, नापोशि गणेश मोहुर्ले, पोशि गोपीनाथ नरोटे सतिश बगमारे स्थागुशा चंद्रपूर यांनी केली आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular