LCB raid on flavored tobacco smuggler, seized tobacco worth 95 thousand
चंद्रपूर :- घुग्गुस येथील प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची विक्री करणाऱ्याचे घरी धाड टाकत Police Raid स्थानिक गुन्हे शाखेने एकूण 95,076 रुपयांचा सुगंधीत तंबाखू जप्त करीत आरोपीला पोलीस स्टेशन घुग्गुस यांच्या ताब्यात देण्यात आले. flavored tobacco smuggler
घुग्गुस पोलीस स्टेशन हद्दीत अवैध सुगंधित तंबाखू साठवून व विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरच्या पथकाला Local Crime Branch Chandrapur प्राप्त झाली त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकली असता 240 पाउच गरुड शिसा हुक्का तंबाखू प्रति 200 ग्रॅम प्रत्येकी 74,400/ रुपये छापील किंमतनुसार, 29 पाउच होला हुक्का शिशा तंबाखू प्रति 200 ग्रॅम प्रत्येकी 4,756/- रुपये, 35 पॉकेट राजश्री पान मसाला गुटका प्रत्येकी 180 ग्रॅम किमतीचे 9450/ रुपये, 3 पॉकेट विमल पान मसाला गुटका प्रति 84 ग्रॅम प्रत्येकी 360/ रुपये, MRP दरानुसार 2,760/- रुपये किमतीचा 92 पॉकेट V-1 तंबाखू, 29 पॉकेट ब्लॅक लेबेल 18 प्रीमियम च्युइंग तंबाकू प्रति 30 ग्रॅम प्रत्येक 870 रुपये, 20 पॉकेट एनी स्वीट सुपारी 1200 रुपये, 4 पॉकेट सिग्नेचर पान मसाला गुटका प्रति 144 ग्रॅम असा तंबाखू साठा आढळून आला यावरून एकूण 95,076 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला ताब्यात घेत पुढील कारवाई करिता घुग्गुस पोलीस स्टेशनच्या स्वाधीन करण्यात आले.
सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर च्या पथकाने केली.