Friday, January 17, 2025
HomeCrimeबकरी ईद च्या पाश्र्श्वभुमीवर गोवंश तस्करी व अवैध दारू विक्रेत्यांवर LCB ची...

बकरी ईद च्या पाश्र्श्वभुमीवर गोवंश तस्करी व अवैध दारू विक्रेत्यांवर LCB ची धडक कारवाई

LCB crackdown on cattle smuggling and illegal liquor sellers on the backdrop of Bakri Eid

चंद्रपूर :- जिल्हा परीसरात अवैद्य धंद्यावर रेड व पेट्रोलींग करित असता दिनांक 16 जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गोपनिय बातमिदारा कडून माहीती मिळाली की गोवंश जनावरांना कत्तलीसाठी निर्देयतेने कोंबून एक ईसम एका अशोक लेयलेंड कपंणीचा दोस्त प्लस वाहना मध्ये भरून चंद्रपूर मार्गे घेवून जाणार आहे.

गोपनीय खबरेवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मौजा लोहारा ते चंद्रपूर रोडवरील हनूमान मंदीरा जवळ पंचासह नाकाबंदी केली असता एक अशोक लेयलेंड कपंणीचा दोस्त प्लस वाहना भरगाव वेगाने येत असताना दिसला त्यास ईशारा करून थांबविले असता, वाहनाची पंचासमक्ष पहाणी केली असता वाहना मध्ये निर्दयतेने कोंबलेले व त्यांचे पाय, मान दोरी ने बांधून चारा पाण्याची कसलीच व्यवस्था नसलेले एकूण 7 जिवंत गोवंशीय गाय जनावरे किमंत 70,000 रुपये व एक जूना वापरता अशोक लेयलेंड कपंणीचा दोस्त प्लस कं. एम एच 34 बि झेड 0104 किमंत 5,50,000 रुपये असा एकुण 6,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन पुढील तपास कामी पोलीस स्टेशन रामनगर यांचे ताब्यात देण्यात आले.

तसेच स्थानिक गुन्हे शाखेला अवैद्य धंद्यावर रेड व पेट्रोलिंग करित असता गोपनिय बातमिदारा कडून माहीती मिळाली की मौजा सावली येथुन गडचीरोली जिल्हयात तीन वेगवेगळ्या वाहनामध्ये देशी विदेशी दारूचा साठा अवैद्रद्यरित्या बाळगुन वाहतूक करित आहेत, अशा खबरे वरून मौजा पारडी ते सावली रोडवरील रूद्रापूर फाट्या जवळ नाकाबंदी केली असता दोन ईसम आले ज्युपीटर मो.सा. ने पायलेटींग करित असता मिळून आले व तिन वेगवेगळ्या वाहनामध्ये एकुण 59 पेटी देशी – विदेशी दारूचा मुछेमाल एकुण किमंत 2,14,500 रुपये व दारू वाहतूकी करिता वापरलेले तिन चारचाकी वाहन व दोन दुचाकी वाहन किमंत 23,45,000 रुपये असा एकुण 25,59,500 रुपयांचा मुद्देमाल आणी एकुण 7 आरोपी संगनमत करून वाहतूक करित मिळूण आल्याने त्यांचे कडुन जप्त करण्यात आला असुन पुढील तपास कामी पोलीस स्टेशन सावली यांचे ताब्यात देण्यात आले.

सदर कारवाई पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांचे नेतृत्वात स्था.गु.शा.चे सपोनि मनोज गदादे, पोहवा दिपक डोंगरे, पोशि गोपीनाथ नरोटे, अमोल सावे स्थागुशा चंद्रपूर यांनी केली आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular