Sunday, December 8, 2024
HomeCrimeतंबाखू तस्कर जयसूखवर गुन्हा दाखल : स्थानिक गुन्हे शाखेने केला 2,14,220 रुपयांचा...
spot_img
spot_img

तंबाखू तस्कर जयसूखवर गुन्हा दाखल : स्थानिक गुन्हे शाखेने केला 2,14,220 रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त

case has been registered against tobacco smuggler                                                     Local Crime Branch seized flavored tobacco worth Rs 2,14,220

चंद्रपूर :- रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील रयतवारी कॉलरी परिसरातील महेश ध्रुवप्रसाद गुप्ता यांचे घरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने LCB Chandrapur धाड टाकली असता Police Raid प्रतिबंधित सुंगधित तंबाखू आढळून आला यावरून आरोपी महेश ध्रुवप्रसाद गुप्ता व व्यापारी जयसूख ठक्कर रा. बल्लारपूर यांचेवर गुन्हा दाखल करीत 2,14,220 रुपयांचा सुंगंधित तंबाखू जप्त करण्यात आला. Flavoured Tobbaco Smuggling

दिनांक 29 एप्रिल रोजी रात्रौ स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस स्टेशन रामनगर परिसरात पेट्रोलींग दरम्यान मुखबिरचे खबरे वरून आरोपी महेश ध्रुवप्रसाद गुप्ता रा. जी. एम. बंगल्या मागे, रयतवारी कॉलरी, चंद्रपुर याचे घराची तसेच त्यांने किरायाने घेतलेल्या खोलीची झडती घेतली असता, सदर दोन्ही ठिकाणी ईगल हुक्का सुगंधीत तंबाकु, होला हुक्का सुगंधीत तंबाकु तसेच मजा 108 सुगंधीत तंबाकु असा एकुण 214220 रूपयाचा माल जप्त करून आरोपी महेश ध्रुवप्रसाद गुप्ता रा. जी. एम. बंगल्या मागे, रयतवारी कॉलरी, चंद्रपुर यास जप्त सुगंधीत तंबाकु बाबत विचारणा केली असता त्यांनी नामे जयसुख ठक्कर रा. बल्लारशाह जि. चंद्रपुर याचेकडुन आणल्याचे सांगितले.
त्यावरून दोन्ही आरोपी विरूध्द पोलीस स्टेशन रामनगर येथे अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करून आरोपीस पुढील तपास कामी पोलीस स्टेशन रामनगरचे ताब्यात देण्यात आले.

सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, यांचे नेतृत्वात सपोनि हर्षल एकरे, पोउपनि विनोद भुरले, किशोर वैरागडे, रजनिकांत पुठ्‌ठावार, सतिश अवयरे, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular