Tuesday, November 12, 2024
HomeCrimeअवैध रेती तस्करांवर LCB ची कारवाई : रेती भरलेले चार ट्रॅक्टर जप्त
spot_img
spot_img

अवैध रेती तस्करांवर LCB ची कारवाई : रेती भरलेले चार ट्रॅक्टर जप्त

LCB action against illegal sand smugglers
Four tractors full of sand seized, case registered against 8 persons

चंद्रपूर :- अवैध रेती तस्करांवर कारवाई करीत स्थानिक गुन्हे शाखेने LCB वरोरा येथील करंजी रेतीघाटाजवळ रेती भरलेले 4 ट्रॅक्टर असा एकूण 20,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत 8 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

वरोरा पोलीस स्टेशन हद्दीतील करंजी रेती घाटावरून अवैध रेती वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त होताच, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने करंजी रेती घाट ते करंजी गावाकडे येणाऱ्या रस्त्यावर नाकाबंदी केली दरम्यान 4 ट्रॅक्टर अवैध रेती वाहतूक करीत वरोरात विक्री करीत असल्यामुळे चार ट्रॅक्टर किंमत 20,00,000 रुपये व प्रत्येक ट्रॉलीमध्ये 1 ब्रास रेती एकूण 20,000 रुपये असा एकूण 20,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत ट्रॅक्टर चालक अनिल अशोक शेंदरे, रा. एकार्जुना, प्रवीण शेषराव उरकुडे, रा. करंजी, आशिष यशवंत थेरे, रा. एकार्जुना, तुषार भास्कर माथनकर, रा. करंजी तर ट्रॅक्टर मालक अमोल गजानन पारोधे, रा. एकार्जुना, सुजित देविदास कष्टी, रा. करंजी, जाकीर रसूल शेख, रा. वरोरा व निलेश अण्णाजी मिलमीले, रा. करंजी यांचेवर पोलीस स्टेशन वरोरा येथे विविध कलमां अंतर्गत गुन्हा नोंद करुन जप्त मुद्देमाल व आरोपी यांना पुढील तपासकामी पो.स्टे. वरोरा यांचे ताब्यात देण्यात आले. LCB action against illegal sand smugglers

सदर कारवाई पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. महेश कोंडावार यांचे नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोहवा धनराज करकाडे, स्वामीदास चालेकर, गजानन नागरे, अजय बागेसर, पोअं. प्रशांत नागोसे, चापोहवा दिनेश अराडे स्थागुशा चंद्रपुर यांनी यशस्वीरीत्या केली.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular