Friday, March 21, 2025
HomeCrimeअवैध सुगंधीत तंबाखू तस्करावर LCB ची धडक कारवाई

अवैध सुगंधीत तंबाखू तस्करावर LCB ची धडक कारवाई

LCB action against illegal flavored tobacco smugglers

चंद्रपूर :- प्रतिबंधित सुगंधीत तंबाखू विक्रीकरिता वाहतूक करणाऱ्याला चारचाकी वाहनासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत 5 लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. Crime

जटपुरा गेट कडुन कस्तुरबा चौक चंद्रपूर कडे जाणाऱ्या रोडने एका मारोती स्वीफ्ट कार क्र MH 40 A 7877 गाडीच्या डिकी मध्ये सतिश उर्फ वैभव उर्फ लादेन गुम्मलवार नावाचा इसम हा चुगडया मध्ये सुगंधित तंबाखु बाळगुण अवैध रीत्या विक्री करीता येत असल्याची गोपनीय माहिती आज दिनांक 11 मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेला LCB मिळाली. illegal flavored tobacco smuggler

या खबरेवरून शहरातील जटपुरा गेट कडुन कस्तुरबा चौक कडे येणाऱ्या दुदलवार हॉस्पीटल समोरील रोडवर नाकेबंदी केली असता एक चारचाकी कार संशयास्पद स्थीतीत जटपुरा गेट कडुन कस्तुरबा चौकाकडे येताना दिसली, सदर कार जवळ येताच त्या कार चालकाला थांबण्याचा इशारा केला असता वाहन चालक सतिश उर्फ वैभव उर्फ लादेन गुम्मलवार रा. चव्हान फॅक्ट्री जवळ जलनगर चंद्रपुर ने चारचाकी वाहन क्र MH 40 A 7877 रोडच्या बाजुला सोडुन पोलीसांना बघताच पसार झाला, Local Crime Branch

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाहनाची झडती घेतली असता ईगंल हुक्का शिशा सुंगंधीत तंबाखु आढळून आला यावरून सुगंधीत तंबाखू व चारचाकी वाहन असा एकुण 5,70,400/- रुपये किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला.

सदर गुन्हा चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन येथे नोंद करून मुद्देमाल पोस्टे चंद्रपूर शहर यांचे ताब्यात देण्यात आले.

सदर यशस्वी कामगीरी पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन चंद्रपूर, अप्पर पोलीस अधिक्षक, रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक, महेश कोंडावार, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, पोउपनि विनोद भुरले, नापोअ. संतोष येलपुलवार, नितीन रायपुरे, अमोल सावे, दिनेश अराडे यांनी केली आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular