laborer who went to cut tendril leaves was seriously injured in the attack of wild boar
कोठारी :- बल्लारपूर तालुक्यातील कोठारी येथील मजूर तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या मजुरावर रानटी डूकराने हल्ला attack of wild boar करून गंभीर जखमी केल्याची घटना तालुक्यातील कोठारी जवळ असलेल्या जगंलात 21 मे रोजी सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास घडली. मारोती पुडलिक चांदेकर (वय 53) रा. कोठारी असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मजुराचे नाव आहे.
तेंदूपत्ता हंगाम सुरु झाला आहे. कोठारी येथील इतर मजूर जंगल परिसरात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेले होते. तेंदूपत्ता तोडून झाल्या नंतर घरी परत येत असताना पाणी पिण्यासाठी दोघी पती पत्नी थांबले व अचानक रानटी डूकराने मारोती चांदेकर यांच्यावर हल्ला चढवला. बाचावाकरिता त्यांनी आरडाओरड केली असता आजूबाजूला असलेले इतर मजूर धावून आले असता डुकराने तिथून पळ काढला. laborer who went to cut tendril leaves was seriously injured in the attack of wild boar
मात्र या झटापटीत मारोती यांच्या हात गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर कोठारी प्राथमिक आरोग्य केंद्रे इथे उपचार करून प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचाराकरीता जिल्हा सामान्य रुग्णालयात चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.
गंभीर जखमी झालेल्या मजुरास शासासनातर्फे मदत देण्यात यावी अशी मागणी होत आहे.
सध्या तेंदूपत्ता हंगाम सुरु असल्याने जंगलालगतच्या गावातील नागरिक तेंदूपत्ता संकलन करीत आहेत. अशातच वन्यप्राण्यांचे हल्ले तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांवर होताना दिसत आहे. यापूर्वी अनेक घटना पुढेही आल्या आहेत. त्यामुळे तेंदूपत्ता संकलन करताना उचित खबरदारी घेणे आवश्यक झाले आहे.