Friday, January 17, 2025
Homeआमदारजिल्हा सामान्य रुग्णालयातील अव्यवस्थेवर आमदार किशोर जोरगेवारांचा संताप : सोनोग्राफीसाठी रुग्णांना 15...

जिल्हा सामान्य रुग्णालयातील अव्यवस्थेवर आमदार किशोर जोरगेवारांचा संताप : सोनोग्राफीसाठी रुग्णांना 15 दिवस ताटकळत ठेवणे योग्य नाही, यावर तात्काळ उपाययोजना करा – आ. किशोर जोरगेवार

MLA Kishore Jorgewar’s anger over the disorder in the District General Hospital

◆ शासकिय वैद्यकिय महाविद्यालय येथे आढावा बैठक, अधिका-यांना दिले निर्देश

चंद्रपूर :- शासकीय वैदयकीय महाविद्यालय येथील अनेक तक्रारी प्राप्त होत असतात. सोनोग्राफी करणे आवश्यक असलेल्या रुग्णांना सोनोग्राफीसाठी आठ ते पंधरा दिवस ताटकाळत ठेवणे योग्य नाही. हा गंभिर असुन हे प्रकार खपवून घेतले जाणार नाही. रुग्णांची सोनोग्राफी वेळीच करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता मिलिंद कांबळे यांना दिले आहे.

शुक्रवारी शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथे आमदार किशोर जोरगेवार यांनी आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या प्रसंगी येथील विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली असुन यावर तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी संबधित अधिका-यांना दिले आहे. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता मिलींद कांबळे, विभाग प्रमुख डाॅ. प्रशांत उईके, अतिरिक्त निवासी वैद्यकीय अधिकारी डाॅ. जिवने, समाजसेवा अधिक्षक उमेश आडे, यंग चांदा ब्रिगेडच्या बंगाली समाज महिला प्रमुख सविता दंढारे, आशा देशमुख, यंग चांदा ब्रिगेडच्या आरोग्य सेविका, वैशाली मेश्राम वंदना हजारे, एमआयएमचे अमान अहमद आदींची उपस्थिती होती. Keeping patients waiting for 15 days for sonography is not appropriate, take immediate measures – MLA Kishore Jorgewar

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेण्यासाठी चंद्रपूर जिल्हासह लगतच्या जिल्ह्यातील रुग्ण येत असतात. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेची मोठी जबाबदारी या रुग्णालयावर आहे. आपण अतिशय जबाबदारीच्या ठिकाणी आहात त्यामुळे आपण उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशा सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिका-यांना केल्या आहे. येणा-या रुग्णांशी रुग्णालयातील कर्मचा-यांची वागणूक योग्य नसल्याचे प्रकार वारंवार समोर येत आहे. आपल्यावरील कामाच्या ताणाची जाण आम्हाला आहे. मात्र आपण रुग्णांशी सौजण्यपुर्ण वागल पाहिजे, रुग्णालयात स्वच्छतेची विशेष काळजी आपण घेतली पाहीजे असे ते यावेळी म्हणाले.

नियमीत स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था येथे असली पाहिजे, वार्डातील लाईट व पंखे बंद असल्यास ते तात्काळ दुरुस्त करावे, रुग्णांचा येथे परिपुर्ण उपचार करावा, वैद्यकीय उपकरणे नादुरुस्त अवस्थेत असतील तर त्याची देखभाल दुरुस्ती तत्काळ करावी, उपकरणे बंद आहेत म्हणून रुग्णांना जाणिवपूर्वक बाहेरुन तपासणी करण्यास बाध्य करण्याचे प्रकार खपविले जाणार नाही असेही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी बैठकीत अधिकार्यांना सांगितले आहे.
डाॅक्टर वेळेत कर्तव्यावर हजर होत नाही. रात्रपाळीत डाॅक्टर उपस्थित नसते अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहे. अशा प्रकाराला आळा घालण्यात यावा, रुग्णालयाच्या बाहेरुन औषधे विकत आणायला लावण्याचे प्रकार बंद करा, रुग्णालयात अनेक उपकरणांची कमी आहे. या संदर्भात तत्काळ वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात यावा, रुग्णांना रक्त त्वरित उपलब्ध होईल यासाठी उपाययोजना करण्यात यावी, रक्तदात्यांच्या नावाची यादी येथे लावण्यात यावी अशा अनेक सुचना सदर बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे. या बैठकीला संबधित डाॅक्टरासह यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-यांची उपस्थिती होती.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular