Keep liquor shops closed on Dr Babasaheb Ambedkar, Bhim Jayanti
चंद्रपूर :- डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 वी जयंती 14 एप्रिल भीम जयंती दिनी दारूचे दुकाने बंद ठेवा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी घुग्गुसच्या वतीने पोलीस निरीक्षक, घुग्गुस पोलीस स्टेशन यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
वंचित बहुजन आघाडी जिल्हा प्रभारी राजेश बोरकर, तालुकाध्यक्ष धर्मेंद्र शेंडे यांच्या माध्यमातून घुग्घुस शहर अध्यक्ष शरद मल्हारी पाईकराव यांचा नेतृत्वात दिनांक 14 एप्रिल 2024 रोजी प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती ही, घुग्घुस शहरामध्ये हजारो जनतेचा संख्येने खुप मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते,
घुग्घुस मध्ये खुप मोठ्या प्रमाणात मिरवणूक, डिजे वाद्य असते, या मिरवणुकीत कसलीही कुठलीही अपरिहार्य घटना होण्यास नाकारता येत नाही करिता दिनांक 14 एप्रिल 2024 रोजी देशी दारू व बार बंद ठेवण्यात यावे अशी मागणी पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन घुग्घुस यांना निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली. Keep liquor shops closed on Dr Babasaheb Ambedkar, Bhim Jayanti
यावेळेस निवेदन सादर करतांना वंचित बहुजन आघाडी घुग्घुस शहर अध्यक्ष शरद मल्हारी पाईकराव, उपाध्यक्ष दत्ता वाघमारे जगदीश मारबते राकेश पारशिवे अशोक भगत आशिष परेकर आदी उपस्थित होते.