Justice to 30 contract workers through the mediation of MLA Subhash Dhote
चंद्रपूर :- राजुरा तालुक्यातील मौजा सोंडो जवळ सुरू असलेल्या जी.आर.एल कंपनी अंतर्गत ए. व्ही. एन. एस. सेक्युरीटी मध्ये कार्यरत ३० कंत्राटी कामगार यांना कामावरून काढून टाकण्यात आले होते.
सदर अन्यायग्रस्त कामगारांनी आमदार सुभाष धोटे यांच्याशी संपर्क साधून आपली व्यथा मांडली. यावर आमदार सुभाष धोटे यांनी कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क साधून या कामगारांना त्वरित कामावर सामावून घेवून त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्यात अशा सूचना केल्या.
अखेर कंपनी व्यवस्थापनाने या सर्व कामगारांना पून्हा सेवेत सामावून घेतले आणि स्थानिक बेरोजगार तरुणांना रोजगारात स्थान देणे, नियमित वेतन देणे, बस उपलब्ध करून देणे इत्यादी मागण्या मान्य केल्या आहेत. Justice to 30 contract workers through the mediation of MLA Subhash Dhote
आमदार सुभाष धोटे यांच्या सुचनेनुसार अभिजीत धोटे यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ कंपनी व्यवस्थापनाला भेटून समस्या सोडविण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली आणि कामगारांना न्याय मिळाला.
या शिष्टमंडळात ओम जाधव, अंकुश श्रीधर, सोहेल शेख, शरद धानोरकर, गणेश करमणकर, पुरुषोत्तम भोंगळे, मनोज भिसेन, विनोद गुरूनुले, अंजय्या मेकल्लवार, भीमराव लोहत, सुरज बालुगवार, अनुराग नेरळवार, निवास कोवे, सचिन वासेकर, सुशील मालखेडे, प्रीतम कोंडदवार, आदर्श उडतलवार, अर्जुन पंधरे, दत्तात्रय मुंडे, किशोर सूर्यवंशी, राहुल गड्डमवार, वासुदेव उपावार यासह अनेक कामगार उपस्थित होते.