Monday, November 11, 2024
Homeक्रीडा व मनोरंजनतीन राज्यातील अभुतपूर्व विजयाचा चंद्रपुरात भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष
spot_img
spot_img

तीन राज्यातील अभुतपूर्व विजयाचा चंद्रपुरात भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष

Joy of BJP workers in Chandrapur for the unprecedented victory in the three states of Rajasthan, Madhya Pradesh and Chhattisgarh

चंद्रपूर :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचे PM Narendra Modi कणखर नेतृत्व, देशभरात विकासाचा झंझावात, ‘सबका साथ, सबका विकास व सबका विश्वास’ हे धोरण यशस्वीपणे राबविल्या गेल्याने भाजपाला मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या राज्यांमध्ये निर्विवाद बहूमत प्राप्त झाल्याने चंद्रपूर महानगरात भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत विजयाचा जल्लोष साजरा केला. नागरीकांना मिठाई वाटून आनंद व्यक्त केला.

भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रमोद कडू, युवा नेते रघुवीर अहीर, यांच्या नेतृत्वात दि. 03 डिसेंबर 2023 रोजी कस्तुरबा चौक (गिरणार) येथे साजरा झालेल्या या विजयोत्सवात ब्रिजभुषण पाझारे, राजेंद्र अडपेवार, गिरीष अणे, सुरेश भाकरे, विनोद शेरकी, गणेश गेडाम, राजेंद्र खांडेकर, राहुल घोटेकर, सविता कांबळे, पुष्पाताई उराडे, चंद्रकला सोयाम, रेणुकाताई घोडेस्वार, शेख जुम्मन रिजवी, अरविंद कोलणकर, राजू येले, रवी चहारे, ललित गुलानी, सय्यद चाँद, स्वप्नील मुन, विशाल गिरी, स्वप्निल कांबळे, मोनिषा महातव, चेतन शर्मा, प्रविण चुनारकर, अवलेश यादव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी या विजयोत्सवात सहभाग घेतला.

या प्रसंगी भाजप कार्यकर्त्यांनी ‘प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जिंदाबाद’ चे नारे देवून तीन राज्य केवल झॉंकी है, लोकसभा अब बाकी है । असे नारे देवून परिसर दणाणून सोडला.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular