Monday, March 17, 2025
Homeधार्मिकअनुसूचित जाती / जमातीची व ओबीसींची शासनाच्या अधिसूचने संदर्भात 20 जानेवारीला संयुक्तिक...

अनुसूचित जाती / जमातीची व ओबीसींची शासनाच्या अधिसूचने संदर्भात 20 जानेवारीला संयुक्तिक बैठक

Joint meeting of Scheduled Castes, Tribes and OBCs on January 20 regarding the notification of Govt

चंद्रपूर :- सामाजिक न्याय विभागाने , अनुसूचित जाती /जमाती, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठी अधिसूचना काढली असून यावर आक्षेप मागवले आहे . त्यामळे या अधिसूचनेवर चर्चा करण्यासाठी 20 जानेवारी 2024 ला आय. एम. ए हॉल, चंद्रपुर IMA Hall येथे दुपारी 12 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आली आहे.

महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियमन) Regulation of issue of caste certificates and their verification अधिनियम २००० च्या नुसार २७ डिसेंबर २०२३ रोजी अधिसूचना प्रकाशित झाली आहे. हे अत्यंत चिंताजनक आहे. त्यावर विचारमंथन करणे हे काळाची गरज आहे. अन्यथा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आणि ओबीसी समाजात मोठ्या प्रमाणात बोगस गिरी होईल. त्यामुळे जर एससी, एसटी, ओबीसी एकत्र येऊन ह्यावर निर्णय घेतला नाही तर बहुजन समाजाचे पतन झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे या अधिसूचनेवर आक्षेप नोंदवण्यासाठी शनिवारी दिनांक 20 जानेवारी 2024 ला आय . एम. ए हॉल ,चंद्रपुर सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपुर जवळ दुपारी 12:00 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आली आहे.

 

या बेठकीला बहुजन बांधवानी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघ, आदिवासी संघर्ष कृती समिती (सर्व जमाती व संघटना संलग्नीत), बहुजन समता पर्व व सर्व SC, ST, OBC, VJ, NT & SBC समाजातील संघटना तर्फे उपस्थित राहण्याचे आवाहन सचिन राजूरकर, डॉ संजय घाटे, डॉ दिलीप कांबळे, डॉ ईसादास भडके, भोला मडावी, मनोज आत्राम, कृष्णा मसराम यांनी केले आहे .

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular