Janata Career Launcher Maintains Great Tradition of 12th Success : Science Result 100%; Most students graduate
चंद्रपूर :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या बारावीच्या सत्र 2023 – 24 चा निकाल आज (दि. 21) ला जाहीर झाला. यानुसार याही वर्षी जनता करिअर लॉन्चरने Janta Carrier Launcher यशाचा इतिहास अबाधित ठेवला आहे.
जनता करिअर लॉन्चर विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागलेला आहे.
जनता करिअर लॉन्चरमधून कु. तन्वी चलाख, रोशन आवारी, तुषार महाकुलकर, कु. अनुश्री घोडमारे, कु. आशीयाणा खोकर, समेक भागवत, गणेश वासेकर, प्रणय दांडेकर, पलक आवळे, तीलक बुरे, श्रेया वाडस्कर, क्रिश गानफाडे, ऋतुजा बोबडे, भार्गव मेहता, हर्षल साळवे, तेजस ढेंगळे, सुशांत धोडरे, पारख सतीबावणे, धनश्री नागपुरे हे आदी विद्यार्थी प्राविण्यप्राप्त Merit List झाले आहेत.
यामधे ८५% पेक्षा अधिक गुण घेणारे ४२ विद्यार्थी, ८० ते ८५% दरम्यान गुण घेणारे ६८ विद्यार्थी, तर ७० ते ८०% दरम्यान ५४ विद्यार्थी प्राविण्यप्राप्त झाले आहेत.
प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे मंडळाच्या अध्यक्षा डॉ. सौ. प्रतिभाताई जिवतोडे, संस्थेचे सेक्रेटरी डॉ. अशोक जिवतोडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. सुभाष, उपप्राचार्य सौ. के. ए. रंगारी, प्रा. लीलाधर खंगार, प्रा. नितीन कुकडे, डॉ. के.सी.पाटिल, प्रा. व्ही.एस.बोढाले, डॉ. ए.के.महातळे, डॉ. माया धमगाये, प्रा. विद्या शिंदे, प्रा. जी. बी. दर्वे, प्रा. शरद कुत्तरमारे, प्रा. रविकांत वरारकर, डॉ. प्रविण चटप, प्रा. महेश यार्दी तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचा-यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.