Inveterate criminal two-wheeler thief arrested by LCB
चंद्रपूर :- चंद्रपूर शहर, कोरपणा व तळोधी बाळापूर हद्दीतून दुचाकी वाहन चोरणाऱ्या Bike Theft चोराला स्थानिक स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरच्या LCB Chandrapur पथकाने राहत्या घरून तीन दुचाकी सह अटक केली. यात एकूण 85,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपी प्रदीप उर्फ पत्त्या संजय शेरकुरे वय 29 वर्ष, रा. धोपटाळा (पारधीगुडा) ता. कोरपना याला अटक Arrested करण्यात आली आहे. Chandrapur Crime
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातिल अधिकारी व कर्मचारी कोरपना पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना गोपनीय माहिती मिळाली की, मोटार सायकल चोरी करणारा प्रदिप उर्फ पत्या संजय शेरकुरे, रा. धोपटाळा (पारधीगुडा) यांचे कडे चोरीच्या मोटार सायकली घरी लपवून ठेवल्या आहे अशा माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचे घरी धाड टाकली असता त्याचे घरासमोर लपवून ठेवलेल्या मोटार सायकल, मोपेड वाहने आढळून आले. Local Crime Branch
यात हिरो स्पेल्डर मोटर सायकल क. म्हणून 34 और 7229, हिरो होंन्डा स्पेल्डर मोटर सायकल क. म्हणून 29 J 1879 व एक नंबर नसलेली होंन्डा डिओ मोपेड Moped असा एकूण 85,000 रुपयांचा मुद्देमाल आढळून आल्याने जप्त करण्यात आला.
सदर मोटार सायकली आरोपीने पो. स्टे. तळोधी बाळापूर, चंद्रपूर शहर व कोरपना पोलीस स्टेशन हद्दीतून चोरी केल्याचे कबूल केले.
सदर कर्यवाही पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर येथिल पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, पो. हवा. नितीन साळवे, प्रकाश बलकी, सुभाष गोहोकार, स्वामीदास चालेकर, प्रशांत नागोसे, मिलींद टेकाम यांनी केली आहे.