Investigate murder of Tamil Nadu Bahujan Samaj Party state president K. Armstrong through CBI: Bahujan Samaj Party demands
चंद्रपूर :- तामिळनाडूच्या बहुजन समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष के.आर्मस्ट्राँग यांची 5 जुलै 2024 रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. ही हत्या केवळ एका व्यक्तीची हत्या नसून लोकशाही मूल्यांवर आणि राजकीय स्वातंत्र्यावरही गंभीर हल्ला आहे. या जघन्य गुन्ह्याचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) द्वारे करण्यात यावा अशी मागणी बहुजन समाज पक्ष जिल्हा चंद्रपूरच्या वतीने निवेदनद्वारे करण्यात आली. Investigate murder of Tamil Nadu Bahujan Samaj Party state president K. Armstrong through CBI
तामिळनाडूच्या बहुजन समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष के.आर्मस्ट्राँग यांची 5 जुलै 2024 रोजी निर्घृण हत्या करण्यात आली, हत्येचा तपासात स्थानिक पातळीवर निष्पक्ष आणि सखोल तपास करण्यात अडचण येऊ शकते. त्यामुळे या प्रकरणाची स्वतंत्र व उच्चस्तरीय यंत्रणेमार्फत चौकशी होणे गरजेचे आहे. आणि अटक करण्यात आलेल्या दोषींसोबतच या घटनेमागील प्रमुख सूत्रधारालाही कठोरात कठोर शिक्षा व्हावी.
या गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा दिल्यास भविष्यात अश्या गुन्ह्यांची पुनरावृत्ती थांबेल आणि कायदा व सुव्यवस्थेवर सर्वसामान्यांचा विश्वास वाढेल.
या संबंधीचे निवेदन महामहीम राष्ट्रपती, पंतप्रधान तसेच गृहमंत्री भारत सरकार यांना जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या मार्फत सादर करण्यात आले.
या वेळी BSP बहुजन समाज पक्षाचे जिल्हा अध्यक्ष शिरीजकुमार गोगुलवार, चंद्रपूर विधनसभा अध्यक्ष अविनाश वानखेडे, विधानसभा सचिव खेमचंद मेश्राम, चंद्रपूर शहर अध्यक्ष अमोल राहुलगडे, घुगुस शहर अध्यक्ष सिध्दार्थ कोंडागुर्ला, प्रशांत रामटेके, प्रितम बोबडे, अमरदीप दसोडे, मंगेश टेबुर्णे, विवेक दुपारे, विवेक नीमगडे व इतर कार्यकर्त्याची उपस्थिती होती.