International Women’s Day celebrated at Indiranagar on behalf of All India Tribal Development Council, New Delhi
चंद्रपूर :- अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नई दिल्ली च्या वतीने इंदिरानगर येथे जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमात समाजासाठी योगदान व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कुसुम आडे, सिंधू मेश्राम, सुशिला आलाम, मीराबाई गेडाम व जोगी नैताम, ज्येष्ठ नीलखंट येरमे आदी कर्तुत्वान महिलांचा व पुरुषांचा सत्कार करण्यात आला. तसेच आरोग्य विभागात टॉप नर्स म्हणून कार्यरत असणाऱ्या श्रद्धा चांदेकर यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदचे प्रदेश सरचिटणीस केशवराव तिरानिक, प्रमुख पाहुणे म्हणून भैय्याजी येरमें, सहाय्यक संचालक कौशल्य विभाग, आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष जनार्धन गेडाम, राष्ट्रवादी महिला काँगेसच्या जिल्हाध्यक्ष तथा अखिल भारतीय आदिवासी विकास परीषदच्या जिल्हासरचिटणीस बेबीताई उईके, डॉ. संध्याताई मसराम, सामाजिक कार्यकर्ते जितेश कुळमेथे, डॉ. अमित मसराम, मीनाताई गेडाम, शुभांगी मॅडम, कुसुम आडे, प्रकाश मेश्राम शाखा अध्यक्ष यांनी उपस्थिती महिलांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदच्या महीला जिल्हाकार्याध्यक्ष नीलिमा आत्राम, यांनी केले तर सूत्रसंचालन सुलभा पेंदाम व जोगी नैतान यांनी केले.
या कार्यक्रमाला उपस्थित अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदचे ज्येष्ठ नेते निळखंट येरमे, पंढरी आत्राम चांगदेव पेंदोर, देविदास गेडाम,बेबीताई येरमे, वैशाली चांदेकर, सुशीला आलाम सुशीला नैताम, सिंधू मेश्राम,मीराबाई गेडाम, गीता नैताम, कविता येरमे,विमल तोडकर, भागरता मेश्राम, विद्या यरमे वंदना गेडाम, उपस्थित होते,
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संतोष आत्राम यांनी केले,
यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषेदेचे महीला पुरुष पदाधिकारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते