The process of inviting candidature applications from the interested Assembly candidates of Congress has started. : MLA Subhash Dhonte’s appeal
चंद्रपूर :- राज्यातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सप्टेंबर – ऑक्टोबर २०२४ रोजीचे दरम्यान होणार आहेत. या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज प्रदेश काँग्रेस कमिटी / जिल्हा कॉँग्रेस कमिटी कार्यालयात दि. १०/८/२०२४ पर्यंत जमा करावेत असे आवाहन चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लोकप्रिय आमदार सुभाष धोटे MLA Subhash Dhote यांनी केले आहे. process of inviting candidature applications from the interested Assembly candidates of Congress has started
विधानसभा मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्जासोबत सर्वसाधारण वर्गासाठी रुपये २०,०००/- (अक्षरी रुपये वीस हजार मात्र) आणि अनु. जाती, अनु. जमाती, व महिला उमेदवारांसाठी रुपये १०,०००/- (अक्षरी रुपये दहा हजार मात्र) याप्रमाणे रक्कम पक्षनिधी म्हणून रोख अथवा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी च्या नांवे डी. डी. द्वारे प्रदेश कार्यालयाकडे / जिल्हा काँग्रेस कमिटीकडे जमा करावेत असे सुद्धा नमूद करण्यात आले आहे.