Infiltration in OBC will not be tolerated: Vidarbha OBC leader Dr. Ashok Jivtode: OBC organizations oppose reservation based on religion
चंद्रपूर :- वारंवार ओबीसी संवर्गातून इतर सधन जाती आरक्षण मागत आहेत. देशातील विविध राज्यात राज्य सरकार मतांचे राजकारण करण्यासाठी धर्माच्या आधारावर सधन जातींना घटनाबाह्यरीत्या ओबीसीत सामावून घेत आहेत. हा खूप मोठा घोटाळा आहे. महाराष्ट्रात मराठा समाज ओबीसीतून आरक्षण मागत आहे. पं. बंगाल, कर्नाटक व इतर राज्यात धर्मानुसार आरक्षण दिल्या जात आहे. ओबीसीतील ही अवैध घुसखोरी खपवून घेतली जाणार नाही, ओबीसीतून आरक्षण देताना त्या जातीचे मागासलेपण तपासून बघितले पाहिजे, असे विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यावेळी संवाद कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलले. Infiltration in OBC will not be tolerated
राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या माध्यमातून पश्चिम बंगाल, कर्नाटक व इतर राज्यात ओबीसी आरक्षणात केलेले घोटाळे उघड करण्यात आले त्याअनुषंगाने ओबीसी संघटनासोबत राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांचेसोबत आज शनिवारी दिनांक 1 जून रोजी स्थानिक जनता महाविद्यालयाच्या सेमिनार हॉल येथे ओबीसी संवाद कार्यक्रम पार पडला. OBC organizations oppose reservation based on religion
राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग मागासवर्गीयांच्या हक्क व अधिकारांचे संरक्षण करेल अशी ग्वाही मंचावरून राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर Hansraj Ahir यांनी दिली.
यावेळी मंचावर ओबीसी चळवळीचे जेष्ठ नेते बबनराव फंड, बबनराव वानखेडे, जेष्ठ विधिज्ञ पुरुषोत्तम सातपुते, माजी आमदार एड संजय धोटे, सामाजिक कार्यकर्ते रमेश राजूरकर, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन कुकडे, ओबीसी मोर्चा चे विनोद शेरकी आदी ओबीसी नेते व समाजबांधवांची उपस्थिती होती.