Infant students shine in 27th National Karate Championship
चंद्रपूर :- २७ वे नॅशनल कराटे चॅम्पियनशिप पुणे येथील बालेवाडी स्टेडियम मध्ये झालेल्या कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत ३५ राज्यातून १०७५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील इन्फंट् जिजस इंग्लिश शाळेतील २ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कुमारी मनस्वी प्रदीप शेंडे, इयत्ता पाचवी हिने ब्राऊन बेल्ट कॅटेगरीमध्ये रौप्य पदक पटकाविले तर कु.जानवी सुनील मोहूर्ले इयत्ता सातवी हिने कांस्यपदक पटकाविला आहे त्याच बरोबर त्यांचे हैदराबाद मध्ये होणाऱ्या इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिप साठी निवड झालेली आहे.
प्रशिक्षक प्रवीण मंगरूळ यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थ्यांनी कराटेच्या क्षेत्रात नावलौकिक मिळविले आहे. खा. धानोरकरांनी वेधले लोकसभेत वेधले केंद्र सरकारचे लक्ष
त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अभिजीत धोटे, मुख्याध्यापिका सिमरन कौर भंगू, मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापक रफिक अन्सारी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.